शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सोयीसाठी आले आणि लोकप्रिय झाले.. हातमोज्यांचा इतिहास हेच तर सांगतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 17:27 IST

खरंतर हातमोज्यांचा उपयोग केवळ त्वचेचं संरक्षण म्हणूनच एकेकाळी केला जात असे मात्र हातमोज्यांनी त्या पलिकडे जात फॅशनच्या जगतात कधी आपली जागा पटकावली ते लक्षातही आलं नाही.

ठळक मुद्दे* प्राचीन काळी शेतकरी आणि मेंढपाळ लोक हातमोज्यांचा वापर आपल्या कामाच्या ठिकाणी करत असत. रोमन लोक तर जेवतानाही हातमोज्यांचा वापर करत.* मध्ययुगात हातमोज्यांमध्ये फरक झाला. या काळात बोटांच्या शिवाय असलेले हातमोजे वापरले जाऊ लागले.* बाराव्या शतकापासून हातमोज्यांनी फॅशनच्या जगतात शिरकाव केला. महिलांच्या फॅशन जगतात हातमोजे महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी म्हणून ओळखले जाऊ लागले.

- मोहिनी घारपुरे-देशमुखहुडहुडी थंडी सुरू झाली की हातमोज्यांशिवाय आणि पायमोज्यांशिवाय पर्यायच राहात नाही. थंडी असो वा तीव्र ऊन, हातांचं संरक्षण करण्यासाठी हातमोज्यांचीच तत्क्षणी आठवण होते. खरंतर हातमोज्यांचा उपयोग केवळ त्वचेचं संरक्षण म्हणूनच एकेकाळी केला जात असे मात्र हातमोज्यांनी त्या पलिकडे जात फॅशनच्या जगतात कधी आपली जागा पटकावली ते लक्षातही आलं नाही.

प्राचीन काळी शेतकरी आणि मेंढपाळ लोक हातमोज्यांचा वापर आपल्या कामाच्या ठिकाणी करत असत. रोमन लोक तर जेवतानाही हातमोज्यांचा वापर करत. कारण, त्याकाळी रोमन लोक काट्याचमच्याचा वापरच करत नसल्याने गरम गरम मांस खाणे हातमोज्यांमुळे सहजसोपे होत असे. तसेच स्वयंपाक करतानाही हातमोज्यांचा वापर ते करत असत. या प्रकारच्या हातमोज्यांना डिजिटालिया असं संबोधलंजाई.मध्ययुगात हातमोज्यांमध्ये फरक झाला. या काळात बोटांच्या शिवाय असलेले हातमोजे वापरले जाऊ लागले. लहान बाळासाठी जे मिटन्स अलिकडे बाजारात मिळतात त्याच धर्तीवर हे हातमोजे होते. शिकार करताना हे हातमोजे वापरले जात. लोखंडी रिंगचा वापर करून चामड्यात शिवलेले आणि सूती लायनिंग असलेले हे हातमोजे सुरक्षेसाठी हमखास वापरले जात.

बाराव्या शतकापासून हातमोज्यांनी फॅशनच्या जगतात शिरकाव केला. महिलांच्या फॅशन जगतात हातमोजे महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी म्हणून ओळखले जाऊ लागले. हे हातमोजे मोती आणि अन्य सुशोभन सामुग्री वापरून सजवले जाऊ लागले. तसेच त्यावर कलाकुसरही केली जाऊ लागली.

हातमोज्यांना मध्ययुगात एक व्यापक अर्थही प्राप्त झाला. सत्ता, वेगळेपण, सामर्थ्य आणि त्याच बरोबर थाट आणि सुंदरतेचं प्रतीक म्हणूनही हातमोजे ओळखले जाऊ लागले. इतकेच नव्हे तर घरंदाजपणा, प्रतिष्ठीतपणा आणि आदर या सा-याचा संकेत हातमोज्यांच्या वापरानं होत असे हे विशेष.राजेरजवाडे, मुख्य धर्मोपदेशक यांचे हातमोजे तर सोनं, चांदी, मोती आणि तत्सम दागदागिन्यांनी मढवलेले असत. तर सर्वसामान्य लोक मात्र चामड्याचे हातमोजे वापरत.

 

 

13 - 14 व्या शतकात जर्मनी आणि स्कँडीनिव्हीयन देशांमध्ये हातमोजे वापरले जाऊ लागले. 17 व्या शतकापर्यंत विणकामाचं मशिन उदयास आलं आणि हातमोजेही विणले जाऊ लागले. फ्रेंच शिंपी यामध्ये प्रारंभीच्या काळात तरबेज झाले होते. नेपोलियनच्या प्रभावाखाली नंतर फ्रेंच शिंपी लोकांनी आपली या कामातील तांत्रिक रहस्य जगासमोर खुली केली.

17 व्या शतकाच्या अखेरीस पोषाखाबरोबर हातमोजे वापरणं अनिवार्य झालं होतं. संपूर्ण जगात हातमोज्यांना प्रचंड मागणी होती व त्यामुळे देशोदेशी हातमोज्यांचं काम मोठ्या जोमानं सुरू झालं होतं. एका देशात हातमोज्यांसाठी लागणारं चामडं विकलं जाई तर दुस-या देशात हातमोज्यांची शिलाई होत असे तर आणखी कुठल्या तिस-या देशात त्यावर कलाकुसर केली जात असे एवढी प्रचंड गती या कामाला आली आणि तितकंच सुंदर सुंदर हातमोजे सहजी मिळवणंही अवघड होऊन बसलं होतं. 1807 साली जेम्स विंटरने हातमोजे शिवण्यासाठी मशिनचा शोध लावला परंतु अगदी 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत बहुतांश देशांमध्ये हातमोजे हातानेच विणले जात. याच काळात रबर हातमोज्यांचे पेटंटही केलं गेलं.

20 व्या शतकात हातमोज्यांच्या उत्पादनाच्या इंडस्ट्रीमध्ये नाट्यमय बदल घडले. याचं कारण या काळात झालेले अनेक मुख्य महत्त्वाचे सामाजिक बदल.एकेकाळी महिलांच्या सन्मानाचं प्रतीक असलेले हातमोजे आता केवळ नाममात्र रूपातच उरले आहेत. सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठीच केवळ लहान मोठ्या हातमोज्यांचा वापर होतो. जीन्स आणि टीशर्टच्या सध्याच्या युगात हातमोज्यांच्या इंडस्ट्रीला मात्र फारच मोठा झटका बसला आहे.

हातमोज्यांच्या वापराशी अनेक परंपरा, प्रतीकं आणि फॅशन जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक संकेतही हातमोज्यांच्या वापरामध्ये दडलेले आहेत. हे जाणून घेणंही आवश्यक असून याबाबतची माहिती पुढल्या लेखात.