नात्यातील दुरावा ठरतो फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:03 IST
असे म्हटले जाते की, दुराव्याने प्रेम वाढते. मात्र आपल्या आवडत्या व्यक्तीपासून जरासाही दुरावा आपल्या...
नात्यातील दुरावा ठरतो फायदेशीर
असे म्हटले जाते की, दुराव्याने प्रेम वाढते. मात्र आपल्या आवडत्या व्यक्तीपासून जरासाही दुरावा आपल्याला सहन होत नाही. मात्र हे खरे आहे की अधूनमधून नात्याला पॉज किंवा ब्रेक हवाच. सतत सोबत राहणे, एकमेकांच्या जीवनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेतल्यामुळे नात्यामधील कुतूहल नाहीसे होते. एक प्रकारचा मोनोटोन येतो, म्हणून आज तुम्हाला दुराव्याचे चार फायदे सांगत आहोत. आठवणप्रेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्या गोष्टी कशा गुलूगुलू वाटतात. मात्र त्याच गोष्ट नंतर त्रासदायक आणि इरिटेटिंग वाटू लागतात. त्यामुळे काही दिवसांचा ब्रेक घेतल्यामुळे तुम्हाला याच गोष्टींची आठवण येईल आणि त्याच्यातील मजा पुन्हा अनुभवण्याची इच्छा जागृत होईल.