ऑनलाईन एन्जॉयमेन्ट विथ 'बिटल्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:35 IST
सत्तरच्या दशकात संपूर्ण जगाला वेड लावणारा बँड म्हणजे 'द बिटल्स'. त्यांच्या संगीताची जादू आजही ओसरले...
ऑनलाईन एन्जॉयमेन्ट विथ 'बिटल्स'
सत्तरच्या दशकात संपूर्ण जगाला वेड लावणारा बँड म्हणजे 'द बिटल्स'. त्यांच्या संगीताची जादू आजही ओसरलेली नाही. बिटल्सच्या चाहत्यांना या ख्रिसमसला स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रथमच त्यांची गाणी ऑनलाईन स्ट्रिमिंग वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. अजून तारीख जरी जाहीर झालेली नसली तरी २४ डिसेंबरपासून ही ऑनलाईन सुविधा सुरू होण्याची चर्चा आहे. कोणत्या कंपनीने गाण्यांचे अधिकार घेतले हे अजून गुलदस्त्यात आहे. १९६0 मध्ये बिटल्स बँड सुरू झाला होता. आयट्यून्स आर्टिस्ट रोस्टरवर येण्यासाठी बिटल्सला सहा वर्षे लागली तर बँडवर आधारित डॉक्युमेन्टरी 'अँन्थॉलॉजी' रिलीज होण्यासाठी २५ वर्षे लागली.