OMG : चक्क २० कोटीचा ‘ब्रा’ घालणारी ही कोण, अन् ती दिसते तरी कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 18:10 IST
तुम्ही कधी कोणी करोडो रुपयांचा ब्रा विकत घेतल्याचे ऐकलयं का? नाही ना? मात्र हे तेवढेच खरे आहे.
OMG : चक्क २० कोटीचा ‘ब्रा’ घालणारी ही कोण, अन् ती दिसते तरी कशी?
बऱ्याचजणांना अति महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवड असते, त्यात महागड्या गाड्या, घड्याळी, बंगलोज् आदी घेतात. मात्र तुम्ही कधी कोणी करोडो रुपयांचा ब्रा विकत घेतल्याचे ऐकलयं का? नाही ना? मात्र हे तेवढेच खरे आहे.फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये एका मोठ्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे सर्वात मोठे विशेष म्हणजे याठिकाणी जगातील सर्वात महागडा ब्रा घालून जैस्मिन ही मॉडेल रॅम्पवर उतरली. फॅशन विश्वात हे पहिल्यांदाच घडले आहे.या स्पेशल ब्राची खासियत म्हणजे यात ४५० कॅरेटचे हिरे लागले असून याला बनविण्यासाठी तब्बल ७०० तास लागले आहेत. या ब्राला एडी बोर्गोने डिझाईन केलं आहे आणि ज्वेलर्स अजीज आणि वालिद यांनी ही तयार केली आहे.