OMG : या कारणाने मुलगा-मुलगीमध्ये फक्त मैत्री नसते !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 20:01 IST
एका संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, दोघांमध्ये कधीच फक्त मैत्री राहू शकत नाही. मग नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये मैत्री राहू शकत नाही...
OMG : या कारणाने मुलगा-मुलगीमध्ये फक्त मैत्री नसते !
एक मुलगा आणि एक मुलगी कितीही म्हणत असतील की, आम्ही फक्त मित्रच आहोत. मात्र त्यांच्या या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. आणि एका संशोधनानुसार हे पण सिद्ध झाले आहे की, दोघांमध्ये कधीच फक्त मैत्री राहू शकत नाही. मग नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगीमध्ये मैत्री राहू शकत नाही, आज याबाबत जाणून घेऊया. अमेरिकेत नेमके याच विषयावर एक संशोधन करण्यात आले. यात असे दिसून आले की, बहुतांश मुले आपल्या मैत्रिणीविषयी मैत्रीपेक्षा प्रेमाची भावना ठेवतात. संशोधनात मुलांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या मनात आपल्या मैत्रिणीसाठी मैत्रीपलीकडचे प्रेम असल्याची कबुली दिली. याउलट मुलींना प्रश्न विचारला असता बहुतांश मुलींनी आपल्या मित्राविषयी फक्त मैत्रीभाव असल्याचे सांगितले. त्या आपल्या मित्राला केवळ जीवलग मित्रच मानतात. मुलींमध्ये मुलांप्रति अधिक मैत्रीभाव दिसून आला. या संशोधनात मैत्रीविषयी मुली व मुलांचे विचार फार वेगळे असल्याचे आढळले. या संशोधनात आढळून आले की मुलगी व मुलाच्या मैत्रीत कुठेतरी प्रेम दडलेले असते. जरी मुली मुलांना आपला चांगला मित्र मानत असतील तरी मुलांच्या मनात मैत्रीपेक्षा प्रेम अधिक असते.Also Read :मुलींशी मैत्री करायचीय?