शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पावसाळ््यात करा आॅफबीट भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 15:12 IST

पावसाळा सुरु झाला की सगळ््यांनाच पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पाऊस ऐंजॉय करण्याचे वेध लागतात. पावसाळ््यात पर्यटकांना अनेक धबधबे साद घालीत असतात. वरुन पडणाºया पावसात, धबधब्यात ओले चिंब भिजण्याचा आनंद हा काही औरच असतो. पण पावसाळ््यातील ट्रीप म्हटले की डोळ््यासमोर काही टिपिकल ठिकाणेच येतात. पण आपल्याकडे काही अशा प्लेसेस आहेत ज्या पर्यटकांना माहित जरी नसल्या तरी अप्रतिम सौंदर्यांनी बहरलेल्या

प्रियांका लोंढे                          पावसाळा सुरु झाला की सगळ््यांनाच पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पाऊस ऐंजॉय करण्याचे वेध लागतात. पावसाळ््यात पर्यटकांना अनेक धबधबे साद घालीत असतात. वरुन पडणाºया पावसात, धबधब्यात ओले चिंब भिजण्याचा आनंद हा काही औरच असतो. पण पावसाळ््यातील ट्रीप म्हटले की डोळ््यासमोर काही टिपिकल ठिकाणेच येतात. पण आपल्याकडे काही अशा प्लेसेस आहेत ज्या पर्यटकांना माहित जरी नसल्या तरी अप्रतिम सौंदर्यांनी बहरलेल्या आहेत मग अशा आॅफबिट ठिकाणांची भटकंती जर या पावसाळ््यात केली तर काय हरकत आहे. अशाच काही ठिकाणांची ही माहिती खास हौशी पर्यटकांसाठी.....                   तापोळा : महाराष्ट्रातील मिनि काश्मीर म्हणुन तापोळ््याकडे पाहिले जाते. तापोळ््याचे निसर्ग सौंदर्य डोळ दिपवून टाकण्यासारखे आहे. महाबळेश्वर पासुन २५ किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण पावसाळ््यात अधिकच नयनरम्य भासते. पर्यटकांना तापोळ््याला जायचे असेल तर जवळच महाबळेश्वर सफर देखील होऊ शकते. तापोळ््याचे खरे अ‍ॅट्रॅक्शन म्हणजे तिथला शिवसागर लेक. भरपुर पाणी असलेल्या या निळ््याशार तळ््यामध्ये म्सतपैकी बोटिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता.                          सोलानपाडा धबधबा : मुंबई पासुन जवळच असलेल्या कर्जतमध्ये सोलानपाडा धबधबा पर्यटकांना खुणावीत असतो. कर्जतच्या निसर्गसौंदर्यात मोरपंख रोवावा असा हा वॉटरफॉल आहे. कर्जत रेल्वे स्टेशनपासुन २६ किलोमीटरवर हा सुंदर धबधबा तुम्हाला पहायला मिळेल. या धबधब्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा निसर्गर्निर्मित वॉटरफॉल नसुन तो पर्यटकांना मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता यावा यासाठी तयार करण्यात आलेला मानवनिर्मित धबधबा आहे. सोलनपाडा डॅमवर बांधण्यात आलेला हा धबधबा पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतू ही जागा पाहण्यासाठी देखील अतिशय मनमोहक आहे. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच पण बाकी पर्यटकांसाठी दर पंधरा मिनिटांनी मिनी बसची व्यवस्था कर्जतपासुन करण्यात आली आहे. पावसाळा हा या धबधब्याला भेट देण्याचा बेस्ट सिझन आहे.मार्लेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये मार्लेश्वर मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असुन डांगरावर वसलेले आहे. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर याठीकाणी गर्दी करतात. पावसाळ््यात येथील नजराणा पाहण्यासारखा असतो. कोकणातील पाऊस तर सर्वांनाच माहित आहे अन त्यामुळेच हे मंदिर पावसातही भाविकांना येण्यापासुन रोखत नाही. एवढेच नाही तर बाव नदीवरील धारेश्वर हा धबधबा देखील येथील प्रमुख आकर्षण आहे. संगमेश्वरपासुन ३० किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर आहे. देवरुख वरुन थेट वसेस देखील मार्लेश्वरला जातात.                          भिवपुरी : माथेरानच्या कुशीत असलेलं हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ पर्यटकांसाठी हॉटेल्स देखील आहेत. येथे गावकºयांना सांगितल्यास ते जेवणाची उत्तम सोय देखील करतात. भिवपुरीला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे भरपूर पर्यटक गर्दी करतात. चिंचोटी : येथे पोहोचण्यासाठी हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर कामन जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जाता येतं.                     तुंगारेश्वर : नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद येथे घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर मात्र कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे तुम्हाला स्वत:ची व्यवस्था करुनच जावं लागतं. पांडवकडा : खारघर परिसरात पांडवकडा या धबधब्यावर गेल्या दहा वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटक गर्दी करत असतात. पण हा धबधबा रिस्की आहे. त्यामुळे धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. पण अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देण्यासाठी येथे येतात. डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते. निसगार्चं सुंदर रुप येथे पाहायला मिळतं.कोंडेश्वर : बदलापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर हा धबधबा आहे. येथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपाºया असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.