फक्त चांगले दिसणेच नव्हे तर, या गोष्टींमुळेही वाढते आकर्षण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:20 IST
एका संशोधनानुसार आवाज आणि सुगंधदेखील आकर्षण वाढविण्यास मोठी मदत करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
फक्त चांगले दिसणेच नव्हे तर, या गोष्टींमुळेही वाढते आकर्षण !
सुंदर दिसण्यानेच आकर्षण वाढते, असे बऱ्याचजणांना वाटते. मात्र एका संशोधनानुसार आवाज आणि सुगंधदेखील आकर्षण वाढविण्यास मोठी मदत करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. व्रोत्सॉव्थ यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी सुमारे ३० वर्षापर्यंत या विषयावर संशोधन केले आणि सर्व संशोधनानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, आकर्षणात सुंदर दिसण्याबरोबरच आवाज आणि सुगंधदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.ज्यांचा आवाज चांगला आहे मात्र तो दिसायला सुंदर नाही तरीही तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे, हेदेखील बऱ्याचदा सिद्ध झाले आहे. तसेच दुसऱ्या संशोधनात विशिष्ट प्रकारचे अत्तर मारणारे व्यक्तीदेखील आकर्षक ठरल्याचे अनेक उदाहरणे आहेत.