शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

संगीतवेड्या तरुणाईचे नवे डेस्टीनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 18:31 IST

शास्त्रीय संगीतासोबतच हवे रॉक, जॉझ, पॉप, फ्यूजन

संगीत म्हणजे ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमच. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतीय संगीताची परंपरा जुनी व महान असून ती आजही कायम आहे. आमीर खुसरोपासून आताच्या नव्या गायकांनी संगीताला समृद्ध केले आहे. आताचे संगीताला नवे आयाम देण्यात सिनेमांची व माध्यमांची भूमिका मोलाची ठरली आहे. नव्या माध्यमांच्या संगीतातून नवे ट्रेन्डस् निर्माण झाले आहे. आताच्या नव्या पिढीला जेवढे वेड पाश्चात्य संगीताचे आहे, तेवढ्याच सहजपणे भारतीय संगीताला आत्मसाद करीत आहे. 
 
अभिव्यक्तीसाठी संगीताचा आधार
रॉक इज अ फ्रीडम. रॉक म्हणजे खूप सारी ऊर्जा, वाईल्ड एक्स्प्रेशन्स. रॉक म्हणजे ते ते सर्व ज्यामध्ये तुम्ही स्वातंत्र्य अनुभव शकता असाच तरुणाईचा समज झाला आहे. तबाल्याच्या सुराएवढीच जादू त्याला बॅण्डच्या सुरात असल्याची जाणीव आहे. गीटार व व्हायलीनचे सूर त्याला भूरळ घालतात. जॅझ म्युझिक म्हणजे तरुणाईच्या आत्म्याचा सूर झाला आहे. स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी त्याला आता संगीताचा आधार घ्यावासा वाटतो. यासोबतच हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताची आवडही त्याने जोपासली आहे. 
 
पाश्चिमात्य संगीताचे नवे फ्युजन
राहुल देव बर्मन यांनी हिंदी सिनेमात पाश्चिमात्य संगीताला स्थान दिले. पाश्चिमात्य संगीत उचलण्याचा आरोप त्यांच्यावर क्रिटीक्सने केला असला तरी त्यावेळच्या तरुणाईने या नव्या प्रयोगाचे स्वागतच केले. ए.आर. रहमानने भारतीय संगीतात वेस्टर्न म्युझिकची गुंफण इतक्या खुबीने केली की भारतीय संगीताच्या संदर्भात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘फ्युजन’ हा शब्द अस्तित्वात आला. प्रस्थापित-प्रचलित संगीतापेक्षा वेगळे संगीत तरुणाईला आवडते हेच यातून सिद्ध झाले.  
 
जुगलबंदीचा नवा अड्डा 
याच दरम्यान भारतात रॉक बॅण्डने धूम केली. इंडियन ओशन, कलोनिअल कजन्स, अ‍ॅव्हिल, एलबीजी, ट्रिपवायर, फॉसिल, थर्मल अ‍ॅण्ड क्वॉटर, सोलमेट, मायक्रोटोन, सिल्व्हर व निकोटीन यासारख्या भारतीय बॅण्डने हिंदूस्थानी संगीत व रॉक म्युझिकला नवे रूपच प्रदान केले. दरम्यानच्या काळात टीव्हीवर आलेल्या कोक स्टुडिओच्या माध्यमातून हे नवे संगीत घरोघरी पोहचले. कोकच्या लाल सेटवर प्रस्थापित संगीतकारांसोबत नव्या गायकांची व नव्या संगीतकारांसोबत प्रस्थापित गायकांची जुगलबंदी तरुणाईला आनंद देणारी आहे.
 
स्मार्टफोनमध्येही म्युझिक अ‍ॅप
आजच्या तरुणाईला स्मार्टफ ोन आपला सोबतीच वाटतो आहे. व्हॉट्सअ‍ॅप, स्कायपी, इन्स्टाग्राम जसे त्याला आवश्यक वाटते तसेच त्याच्या स्माटफोनमध्ये म्युझिक अ‍ॅपने आपली जागा निर्माण केली आहे. विंक, सावन, गाना, हंगामा, साऊंड क्लाऊड, ट्युनईन रेडिओ, कोक स्टुडिओ, जेबीएल, रागा यासारख्या अ‍ॅप नसतील तर आश्चर्यच म्हणावे लागेल. 
 
संगीतातही दिसतेय करिअर
गायक किंवा वादक होण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कम्पोजर, प्रशिक्षक, गीतकार, म्युझिक पब्लिशर, म्युझिक जर्नालिस्ट, डिस्क जॉकी, म्युझिक थेरेपिस्ट, आर्टिस्ट असे विविध पर्याय उपलब्ध असतात. म्युझिक चॅनल्सची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता व कार्यक्रमांना कापोर्रेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व, यामुळे संगीत क्षेत्र युवकांना भुरळ घालत आहे.
 
चित्रपटातून मिळते ऊर्जा
बॉलिवूडसह अन्य भारतीय भाषांत नायक हा गायक असलेले अनेक चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. रॉक आॅन, रॉक स्टार, आशिकी 2 यासारखे चित्रपट संगीतवेड्या तरुणाईला नवी उर्जा देणारे ठरले आहेत. लवकरच फरहान अख्तरचा ‘रॉक आॅन 2’ व रितेश देशमुखचा ‘बँजो’ हे संगीतावर आधारित असलेले चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत हे चित्रपट देखील तरुणाईत नवा उत्साह संचारतील यात शंकाच नाही.