अँड्रॉईच्या नव्या व्हर्जनचे नाव ‘नेयप्पम’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 14:40 IST
केरळमधील पारंपरिक गोड पदार्थ ‘नेयप्पम’वर गुगल शिक्कामोर्तब करू शकते.
अँड्रॉईच्या नव्या व्हर्जनचे नाव ‘नेयप्पम’?
स्मार्टफोन आॅपरेटिंग सिस्टिम (ओएस) ‘अँड्राईड’चे नवे व्हर्जन 7.0 लवकरच उपलब्ध होणार आहे.‘मार्शमेलो’, ‘जेलिबिन’, ‘किटकॅट’ यांप्रमाणे नव्या व्हर्जनचे नाव कोणत्या मिष्टान्नाचे असेल याची सध्या खूप चर्चा सुरू आहे.गुगलने आधीच घोषित केले आहे की, या व्हर्जनचे नाव इंग्रजी अक्षर ‘एन’ पासून सुरू होणाऱ्या गोड पदार्थाचे असावे.कंपनीने आॅनलाईन पोलच्याद्वारे सामान्य लोकांना नाव सुचविण्याचे आव्हान केले. त्यानुसार जगभरातून विविध गोड पदार्थांचे पर्याय समोर आले आहेत.‘नौगट’ आणि ‘न्युटेला’ अशी दोन नावे सुरूवातीला आघाडीवर होती; मात्र आता एका भारतीय मिष्टान्नाला नेटिझन्सची अधिक पसंती मिळत आहे.टेक्नो जगतात जोरदार चर्चा आहे की, केरळमधील पारंपरिक गोड पदार्थ ‘नेयप्पम’वर गुगल शिक्कामोर्तब करू शकते. तांदूळ आणि गुळापासून तयार करण्यात येणारा हा पदार्थ दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहे.गुगलचे सीईओ सुंदर पिचई भारतीय असल्यामुळे ‘नेयप्पम’ नावाची निवड होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. परंतु जगभरातील लोकांना या नावाचा उच्चार करणे कितपत जमेल यावर काहींनी शंका व्यक्त केली आहे. नऊ जून रोजी हा पोल बंद होणार असून तुम्हाला दुसरा एखादा पदार्थ माहित असेल सुचवा पटकन!