शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कॉमिक पुस्तकावर आधारित चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 06:35 IST

कॉमिक पुस्तकावर आधारित चित्रपटकॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. सध्या डेडपूल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स आॅफिसवर धमाल करतो आहे. फॉक्स, सोनी, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, मार्व्हेल स्टुडिओजचा असे चित्रपट तयार करण्यात हातखंडा आहे. कॉमिक चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा आहे. २०१६ साली अशा प्रकारचे किमात सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. येत्या २०२० पर्यंत सुमारे ६३ चित्रपट येतील अशी अपेक्षा आहे.

कॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. सध्या डेडपूल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स आॅफिसवर धमाल करतो आहे. फॉक्स, सोनी, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, मार्व्हेल स्टुडिओजचा असे चित्रपट तयार करण्यात हातखंडा आहे. कॉमिक चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा आहे. २०१६ साली अशा प्रकारचे किमात सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. येत्या २०२० पर्यंत सुमारे ६३ चित्रपट येतील अशी अपेक्षा आहे.डेडपूलसध्या हा चित्रपट उत्तर अमेरिकेत धमाल करतो आहे. मार्वल कॉमिक्सच्या एक्स मेनमधील एक पात्र आहे डेडपूल. विशेष म्हणजे हा हिरो नाही, व्हिलन आहे. हा अत्यंत वेगाने तलवार चालवितो, कोणतीही जखम क्षणात दुरुस्त होते, असे हे पात्र आहे. डेडपूल हा आजच्या युवा वर्गाचा हिरो आहे. याचे डायलॉग्ज प्रसिद्ध आहेत. भारतात या चित्रपटाला बरीचशी कात्री लावण्यात आली आहे. बॅटमन वि. सुपरमॅन: डॉन आॅफ जस्टीसया चित्रपटाच्या नावावरुनच सारे काही लक्षात येईल. या चित्रपटात बॅटमन (बेन अफ्लेक) हा सुपरमॅन (हेन्री कॅव्हील) याच्याशी लढताना दिसेल. आता अशा सिक्वेल चित्रपटाची यादी मोठी आहे. यामध्ये व्हिलनही जोरदार असतो. जेसी एलिनबर्गचा लेक ल्युथर हा अ‍ॅक्वामन (जेसन मोमोवा), वंडर वुमन (गल गॅडट) आणि सायबोर्ग (रे फिशर) यांच्यासोबत दिसेल. झॅक सिंडर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.कॅप्टन अमेरिका: सिव्हील वॉरया चित्रपटात टोनी स्टॉर्क हा सुपरहिरोच्या माध्यमातून काम करताना दिसून येईल. सरकारच्या प्रश्नावरचे हे युद्ध आहे. कॅप आणि स्टार्क यांच्यात जोरदार लढाई होणार आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि ख्रिस इव्हान्स या चित्रपटात काम करणार आहेत. यामध्ये ब्लॅक पँथर (चाडविन बोसमन) असणार आहे. २९ एप्रिल रोजी इंग्लंडमध्ये हा चित्रपट प्रदशित होईल.एक्स मेन: अपोकॅलप्सजुन्या एक्स मेनची आठवण करुन देणारा हा चित्रपट आहे. किंबहुना त्याच्याही पुढे जाणारा हा चित्रपट आहे. यामध्ये झेव्हिअर हा अ‍ॅपोकॅलप्सशी लढताना दिसेल. हा चित्रपट भव्य आणि दिव्य असणार आहे. एप्रिल २०१५ पासून या चित्रपटाची शुटींग सुरु झाली. ह्यूज जॅकमनचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. बरेचसे कलाकार हे एक्स मेन मधीलच असतील अशी अपेक्षा आहे.टीनेज म्युटन्ट्स निन्जा टर्टल्स २विल्यम फिचनर हा चित्रपटात असेल. त्याशिवाय मायकेल बे हा पुन्हा एकदा या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. जोनाथन लिबेसमन हा देखील या चित्रपटात असू शकतो. स्टीफन अमेल हा कॅसी जोन्सची भूमिका करु शकेल.सुसाईड स्क्वॉडअमेरिकन सरकारच्या एका मिशनवर जाणारे हे पथक आहे. विल स्मिथ हा शार्पशूटरची भूमिका करतो आहे. जेर्ड जेटो जोकर हा देखील असू शकतो. डेव्हीड अयेर हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. जोएल किनमन हा देखील असेल. येत्या आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट येणार आहे.