जूलिया ‘वंडर’मध्ये आईच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:17 IST
अभिनेत्री जूलिया राबर्टसने आगामी चित्रपट ‘वंडर’मध्ये आईची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला आहे. हा चित्रपट आर. जे. पेलेसियो यांच्या ‘वंडर’ या नावावरच आधारित आहे.
जूलिया ‘वंडर’मध्ये आईच्या भूमिकेत
अभिनेत्री जूलिया राबर्टसने आगामी चित्रपट ‘वंडर’मध्ये आईची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला आहे. हा चित्रपट आर. जे. पेलेसियो यांच्या ‘वंडर’ या नावावरच आधारित आहे. चित्रपटात तरुण कलाकाराच्या रुपात जॅकोब ट्रेम्ले ब्री लार्सनसोबत झळकणार आहे. त्यात तो आॅगी पुलमॅनची भूमिका साकारत आहे. आॅगी पुलमॅन एक मुलगा असून, ज्याचा जन्मताच चेहरा विकृत आहे. त्यामुळे जेव्हा तो पहिल्यांदा शाळेत पाउल ठेवतो, तेव्हा त्याला येणाºया अडचणींवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट स्टीफन चोवोस्कीद्वारा दिग्दर्शित केला जाणार आहे. २०१२ मध्ये ही कांदबरी तरुण वाचकांसाठी जाहिर करण्यात आली होती. आतापर्यंत या कांदबरीच्या २० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.