जगातील आधुनिक कर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:10 IST
मॅक्स या आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त ९९ टक्के संपत्ती दान करणार्या मार्क झुकरबर्गने दानशिलतेचा नवा अध्याय लिहिला आहे.
जगातील आधुनिक कर्ण
मॅक्स या आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त ९९ टक्के संपत्ती दान करणार्या मार्क झुकरबर्गने दानशिलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. मार्कच्या आधीही अनेकांनी मनाचा असाच मोठेपणा दाखवला आहे. आधुनिक काळातील दानशूर कर्णांचा हा धावता आढावा..वॉरेन बफे : ह्यबर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीचा ९९ टक्क्यांपैकी जास्त वाटा दान करण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम तब्बल २२.७ मिलियन डॉलर्स इतकी भरते.बिल आणि मेलिंडा गेट्स : टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील या तज्ज्ञांनी आपल्या वैयक्तिक मिळकतीपैकी ९५ टक्के वाटा (३१.५ अब्ज डॉलर्स) दान करण्याचे ठरवले आहे. विविध सामाजिक कार्यांसाठी ही रक्कम वापरली जाईल.रिचर्ड ब्रेस्नन : व्हर्जिन ग्रुपचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रेस्नन आणि त्यांची पत्नी जोआन समाजशील वृत्तीसाठी ओळखले जातात. आपल्या अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीपैकी ५0 टक्के रक्कम दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे.जॉर्ज सॉरोस : हाय प्रोफाईल गुंतवणूकदार जॉर्ज सॉरोस यांनी ११.४ बिलियन डॉलर्स सामाजिक उपक्रमांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.