मनगटावरील घड्याळ बनेल व्यक्तित्त्वाचा आरसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:25 IST
पुरुषाचा पेहराव रुबाबदार असायलाच हवा असा सल्ला दिला जातो.
मनगटावरील घड्याळ बनेल व्यक्तित्त्वाचा आरसा
पुरुषाचा पेहराव रुबाबदार असायलाच हवा असा सल्ला दिला जातो. व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे यासाठी हा सारा खटाटोप असतो. मनगटावर असलेले घड्याळ हे देखील व्यक्तिमत्त्व खुलवायला मदत करीत असते. म्हणूनच तुमच्या व्यक्तित्त्वानुसार कोणते घड्याल तुम्हाला शोभू शकेल, याची माहिती येथे देत आहोत.घड्याळ खरेदी करताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की, कधीही स्वस्त घड्याळ घेऊ नका. अशी घड्याळ वापरण्या जोगी तर नसतातच त्यासोबत जास्त काळ टिकतही नाहीत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार घड्याळची निवड करू शकता. ज्या लोकांच्या हातावर केस आहेत त्यांनी धातूचे घड्याळ वापरणे टाळावे. अशी घड्याळ तुमच्या हातावरील केस खेचतात आणि तुम्हाला असा अनुभव लोकांसमोर झालेला आवडणार नाही. सुरक्षिततेसाठी आणि शैलीदारसाठी साधे बेल्ट असलेले घड्याळ निवडा. जर तुमचा हात मोठा किंवा जाड असेल तर असे घड्याळ निवडू नका जे तुमच्या हातावरती दिसणारच नाही. अशा घड्याळची निवड करा ज्याची व्यासाची 50 मिलीमीटर इतकी लांबी असेल. अशा वेळी तुम्ही डिझायनर घड्याळ देखील निवडू शकता. बारीक हात असलेल्या लोकांना माध्यम आकाराच्या घड्याळाची निवड करावी. जेणेकरुन ते मनगटावर शोभून दिसेल. मोठे घड्याळ घातल्यास ते गमतीचा विषय होईल. बारीक हात असणार्यांनी सामान्यत: साधे घड्याळ वापरणे योग्य ठरते.