'स्टार वॉर्स'साठी मॅक्स सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:04 IST
'स्टार वॉर्स' हा चित्रपट सध्या चांगलाच जोरात आहे. फेसबुकचा सीईओ मार...
'स्टार वॉर्स'साठी मॅक्स सज्ज
'स्टार वॉर्स' हा चित्रपट सध्या चांगलाच जोरात आहे. फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याच्यावरही या चित्रपटाने गारूड केलेय. या प्राऊड फादरने आपली मुलगी मॅक्स हिचा फोटो अलीकडेच फेसबुकवर शेअर केला आहे. यात मॅक्सने 'जेडी' या 'स्टार वॉर्स चित्रपटातील एका पात्राप्रमाणे पोशाख परिधान केला आहे.यात तिच्या आजूबाजूला इतर पात्रांच्या प्रतिकृती ठेवलेल्या दिसतात. मॅक्सच्या समावेशामुळे 'स्टार वॉर्स'ची टीम तगडी झाल्याची पोस्ट झुकेरबर्गने फोटोसह शेअर केली. 'स्टार वॉर्स'ने जगभरात चांगली कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १. ४१ कोटी डॉलर्स कमावले आहेत. यापैकी ५२ लाख डॉलर्स एकट्या फ्रान्समधून मिळाले.