फेसबुक पेजवर मर्लिनचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 21:13 IST
सौंदर्याचा खजिना असलेली हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मनरो हिच्याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मर्लिन मनरो म्हटले की, तिचा उडणाºया ड्रेसमधील फोटो असे चित्र लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
फेसबुक पेजवर मर्लिनचे फोटो
सौंदर्याचा खजिना असलेली हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मनरो हिच्याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मर्लिन मनरो म्हटले की, तिचा उडणाºया ड्रेसमधील फोटो असे चित्र लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्या फोटोमध्ये मर्लिनचे जे सौंदर्य पाहायला मिळाले आहे, त्याने सर्वांनाच घायाळ केले आहे, असे म्हणता येईल. पण ही त्या फोटोची कमाल नाही, तर मर्लिन मनरो ही मुळातच अमाप सौंदर्याचे एक मूर्तिमंत उदाहरण होते. तिच्या प्रत्येक फोटोमधून डोळ्यांना शांतता देणाºया सौंदर्याचे दर्शन व्हायचे. अत्यंत कमी वयात मर्लिन मनरोने जगाचा निरोप घेतला. पण तिच्या आठवणी देणाºया अनेक बाबी ती मागे सोडून गेली. तिची आठवण असलेले असेच काही आजवर समोर न आलेले फोटो तिच्या फॅन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मर्लिनच्या मृत्यूपूर्वीच्या अखेरच्या फोटोशूटमधील हे फोटो आहेत. तिचा एका पूर्ण न होऊ शकलेल्या अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरचे हे आॅन लोकेशन फोटो आहेत. एका फेसबूक पेजवर हे फोटो अपलोड केले आहेत. लूक नावाच्या मॅगझनिसाठी १९६० मध्ये हे फोटो क्लिक करण्यात आले होते, असे या पेजवर म्हटले आहे. लॉरेन्स शिल्लप नावाच्या फोटोग्राफरने मर्लिन मनरो हिचे हे फोटो टिपले आहेत.