मारियाचा मॅक्सिकोच्या बीचवर हॉट लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:15 IST
डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर निलंबनाच्या कारवाईचा सामना करणाºया टेनिस स्टार मारिया शारापोवा सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्या साजºया करीत आहे.
मारियाचा मॅक्सिकोच्या बीचवर हॉट लुक
डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर निलंबनाच्या कारवाईचा सामना करणाºया टेनिस स्टार मारिया शारापोवा सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्या साजºया करीत आहे. मॅक्सिकोच्या बीचवर अमेरिकन अभिनेत्री तथा कॉमेडियन चेल्सिया हॅँडलर हिच्यासोबत तिचे काही बिकनीवरचे फोटोज् सध्या चर्चेचा विषय बनली आहेत. फोटोंमध्ये मारिया आणि चेल्सिया अतिशय आनंदी मुडमध्ये बघावयास मिळत आहे. ४१ वर्षीय चेल्सियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती मारियासोबत डांस करीत आहे. चेल्सियाने कॅप्शनमध्ये ‘मी स्वीमसूट आणायला विसरली’ असे लिहले आहे. तर मारिया या फोटोमध्ये खुप सुंदर दिसत आहे. टेनिस जगतामधील सर्वाधिक कमाई करणारी मारिया एकमेव महिला खेळाडू आहे. जागतिक टेनिस रॅकिंगमध्ये ती सातव्या क्रमाकांवर आहे.