शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

​पुरुष मित्रांनो! होऊन जाऊ द्या थोडं ‘कथ्थक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 19:13 IST

अपर्णा मिश्रा रविवारी (ता. १९) मुंबईतील (एनसीपीए) येथे खास पुरुषांसाठी कथ्थक कार्यशाळा घेणार आहेत.

‘कथ्थक’ म्हटल्यावर लगेच तुमचे कान टवकारले असतील. पुरुष आणि कथ्थक? शक्यच नाही असे भाव चेहऱ्यावरही आले असतील.कारण काय आहे ना, शास्त्रीय नृत्य आणि खास करून कथ्थक म्हटले की ते केवळ मुलींनीच करावे असा गैरसमज प्रचलित आहे. पण हे कोणी ठरवले की, कथ्थक केवळ मुलींनीच करावे?हाच गैरसमज दूर करण्यासाठी प्रसिद्ध नृत्यगुरू अपर्णा मिश्रा रविवारी (ता. १९) मुंबईतील नॅशनल थिएटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे खास पुरुषांसाठी कथ्थक कार्यशाळा घेणार आहेत.‘कथ्थक फॉर हिम’ असे या कार्यशाळेचे नाव असून यासंबंधी बोलताना त्या सांगतात की, कथ्थकमध्ये नृत्यातून कथा सांगितली जाते. आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. त्या व्यक्त करण्यासाठी ‘स्त्री’च असावे लागते असे नाही. हसणं, रडणं, लाजणं, मन मोकळं करणं यासाठी लिंगभेद करू नये. या कार्यशाळेतून हेच सांगण्याचा, पटवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेली सोळा वर्षे त्या कथ्थक शिकवत आहेत. आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त मुलामुलींना त्यांनी कथ्थक शिकवले. रविवारी ‘फादर्स डे’चे निमित्त साधून त्यांनी हे वर्कशॉप आयोजित केले आहे.त्यामध्ये पुरुषांसाठी असणारे विशेष ताल, भाव, बोल, शैली यांचा सामावेश केला जाणार. पुरुष हे गणितीयपद्धतीने विचार करणारे असतात. त्यामुळे कार्यशाळेत याच आधारावर पुरुषांना कथ्थक शिकवले जाणार. दैनंदिन घटना, कार्यक्रम, गोष्टींना कार्यशाळेत नृत्यातून दर्शविण्यात येणार आहे.निसर्गाने स्त्री-पुरुषांना भिन्न बनवले आहे. पण याचा अर्थ असा नाही की, कोणी एक दुसºयापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघे एकमेकांना पुरक आहेत. दोघांची बलस्थाने, भावनांचे पदर, विचारांची भिन्नता या कार्यशाळेत नृत्यातून अधोरेखीत केली जाणार आहे. ‘पुरुषांसाठी आपल्या रुटिनमधून काहीसं वेगळं आणि मनाला टवटवित करणारा अनुभव घेण्याची संधी ‘कथ्थक फॉर हिम’द्वारे मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.तर मग विचार कसला करताय? होऊन जाऊ द्यायचे का थोडं कथ्थक.