शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

​असा करा नेटबॅँकिंगचा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:09 IST

एक महिन्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेने ५०० आणि १००० रुपयाची जुनी नोट बंद केली आहे. या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता जनतेला कॅशलेस इकॉनॉमीकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वांना नेट बँकिंग, मोबाइल बॅँकिंग, स्वाईप मशिन तसेच चेकद्वारे आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. आजच्या सदरात आपण नेटबॅँकिंगचा वापर कसा करावा याबाबत जाणून घेऊया...

-Ravindra Moreएक महिन्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेने ५०० आणि १००० रुपयाची जुनी नोट बंद केली आहे. या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता जनतेला कॅशलेस इकॉनॉमीकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वांना नेट बँकिंग, मोबाइल बॅँकिंग, स्वाईप मशिन तसेच चेकद्वारे आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. आजच्या सदरात आपण नेटबॅँकिंगचा वापर कसा करावा याबाबत जाणून घेऊया...नेटबॅँकिंगमुळे मोबाइल, वीज बिल, गॅस बिल, डीटीएच, म्युच्युअल फंड तसेच पैसे ट्रान्सफर करणे अगदी सोपे असून, सर्वच राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांना याचा उपयोग करता येऊ शकतो.कसे सुरू कराल नेटबॅँकिंग?नेटबॅँकिंग सुरू करण्यासाठी बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भरुन द्यावा लागतो. फॉर्म भरुन दिल्यानंतर नेटबॅँकिंग सुरू करुन दिले जाते. त्यानंतर एक कस्टमर आयडी आणि आयपीन दिला जातो. सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्याचा हा योग्य मार्ग आहे. याद्वारे ग्राहकांना कुणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तात्काळ कॅशलेस व्यवहार करता येऊ शकतोे.कसे कराल पैसे ट्रान्सफर?कस्टमर आय.डी. आणि आयपिन मिळाल्यानंतर संबंधित बॅँकेच्या अधिकृत वेबपेजवर जावे. तिथे पहिल्यांदा कस्टमर आयडी टाकण्याचा पर्याय येईल. कस्टमर आयडी टाकल्यानंतर आयपिन टाकण्याचा पर्याय येईल. लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा खात्याचा तपशील दाखवला जाईल. बाजूलाच फंड ट्रान्सफर हा पर्याय दिलेला आहे. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांच्या बँकेचा आयएफएससी कोड, बँक खाते नंबर आवश्यक आहे. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर बेनिफिशिअरी क्रमांक म्हणजे ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा तपशील तयार करणं गरजेचं आहे. फंड ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर बाजूलाच रिक्वेस्ट हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अ‍ॅड बेनिफिशिअरी हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ज्यांना पैसे पाठवायचे त्यांचा आयएफएससी कोड, खाते क्रमांक ही माहिती दिल्यानंतर पुढील स्टेपमध्ये जावे. खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाकून पुढे गेल्यानंतर कन्फर्म करण्यापूर्वी तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून बेनिफिशिअरी तयार करावं. बेनिफिशिअरी तयार केल्यानंतर सरासरी ३० मिनिटांनंतर तुम्ही पैसे पाठवू शकता. ३० मिनिटांनंतर इतर बँकांना पैसे पाठवता येतील. त्याच बॅँकेच्या ग्राहकाला पैसे पाठवायचे असतील तर ‘ट्रान्सफर विदिन बँक’ हा पर्याय निवडावा किंवा इतर बँकेच्या ग्राहकाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर 'ट्रान्सफर टू आॅदर बँक' हा पर्याय निवडावा. त्याच बॅँकेच्या ग्राहकालाच पैसे पाठवायचे असतील तर तीन स्टेपमध्ये पैसे पाठवता येतात. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला सेव्हिंग किंवा करंट अकाऊंटमधून पैसे पाठवायचे आहेत, तो पर्याय निवडावा. त्यानंतर ‘ट्रान्सफर नाऊ’ हा पर्याय निवडून तुम्ही अ‍ॅड केलेल्या बेनिफिशिअरीचा क्रमांक निवडावा. जेवढे पैसे पाठवायचे आहेत ती रक्कम टाकावी. त्यानतंर कन्फर्म करावं. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला खात्याशी कनेक्टेड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानतंर काही क्षणात पैसे ट्रान्सफर होतील.नेटबँकिंगच्या मर्यादानेटबँकिंग हा बँकेकडून ग्राहकाला दिलेला आर्थिक व्यवहाराचा कॅशलेस पर्याय आहे. यामुळे कसलाही व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. एका दिवसात कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला एक रुपयापासून ते १० लाखापर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात. यासाठी कोणताही अधिकचा कर लागत नाही. नोटाबंदीनंतर नेटबँकिंगचा वापर जवळपास २०० टक्क्यांनी वाढल्याचं बोललं जात आहे. नेट बँकिंग प्रक्रिया सर्व बँकांची थोड्या फार फरकाने सारखीच आहे.