शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडिया दिवास्वप्न ठरू नये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 05:37 IST

ेआपल्या देशात सध्या 'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मेक इन इंडिया' जागराला देशाच्या आर्थिक राजधानीत प्रारंभ झाला अन् पंतप्रधान मोदींनी स्वत: जातीने उपस्थित राहून मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन केले. मुंबईला देशातील पहिला मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्याचा मान मिळाला असून मेक इन इंडियाच्या आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीतेबद्दल काही शंकाही आहेत. आपल्या शहरातील तरुणाईही या प्रकल्पाच्या सकारात्मक-नकारात्मक दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करीत आहे. त्याचा सीएनएक्सने घेतलेला हा विशेष आढावा... ‘मेक इन इंडिया’. पंतप्रधानांचा हा ड्रिम प्रोजेक्ट. हा ड्रिम प्रोजेक्ट भारताला नेमका किती फायदा करून देईल? विदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतात करुन पंतप्रधान भारतीय उद्योजकाला डावलत तर नाही ना अशा अनेक प्रश्नांकडे या तरुणाईने लक्ष वेधले. फक्त गुंतवणूक करुन होणार नाही तर त्यातून जनतेला नक्कीच लाभ मिळायला पाहिजे. ४९ देशांचे प्रतिनिधी आणि ६८ देशांतून दाखल झालेले शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. भारताकडे असलेल्या सर्व सोयी-सुविधा आम्ही गुंतवणूकदारासाठी खुल्या करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले. मात्र विदेशी गुंतवणूक वाढल्याने त्या कंपनीचे अथवा गुंतवणूकदारांचे नखरे देखील भारताला सहन करावे लागणार आहेत, याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा या तरुणाईने व्यक्त केली.  भारतातील उद्योग, कंपन्यांचे काय?मोठा गाजावाजा करुन पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा शुभारंभ केला. विदेशातील गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू अशी हमी दिली. अन् ते त्यांना मान्य झाले. मात्र भारतात असलेल्या छोट्या- मोठ्या उद्योजकांसाठी पंतप्रधानांनी असे काही विशेष प्रयत्न करणार आहेत का, याचे उत्तर मिळणेही गरजेचे आहे. या लहान उद्योजकांचाही विचार करायला हवा.                     - दिव्या स्वामी विदेशी गुंतवणूकदारांचे स्वागतभारतात गुंतवणुकीसाठी विदेशातून आलेल्या सर्व उद्योजकांचे मी स्वागत करते. मात्र आता जबाबदारी वाढली आहे. या उद्योजकांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी शासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गरज आहे.  असे झाले नाही तर पुढील काळात कोणताही देश भारतात उद्योग उभारण्याबाबत विचार करीत बसेल.                    - स्नेहल वासनिकमहाराष्ट्राचा मान वाढलापंतप्रधानांजवळ मेक इन इंडियासारखा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अनेक राज्यांचे पर्याय खुले होते. मात्र त्यांनी महाराष्ट्राला हा बहूमान मिळवून दिला. हे आपले भाग्य आहे, असे मी समजते. मुंबईला झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांचे मनोबल नक्कीच वाढेल. पंतप्रधानांचे ध्येय अन् त्यांचे दूरचे विचार नक्कीच लाभदायक ठरतील असा मला विश्वास आहे.  - अंजली टेकचंदानीपायाभूत सुविधा, दळणवळणाची साधनेही बघा हा सोहळा संपल्यानंतर राज्याला यातून काय मिळणार, हा खरा प्रश्न आहे. सर्वसामान्यांना पडलेल्या या प्रश्नाचा धांडोळाही शासनाने घ्यायला हवा. या सोहळ्यातून मुंबईची आधीचीच 'आर्थिक राजधानी' म्हणून असलेली ओळख आणखी पक्की करण्यावर असणार आहे का?. अर्थात या प्रयत्नांना कितपत यश मिळेल आणि राज्याचे रोजगार, पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने या दृष्टीने जीवन किती सुसह्य होईल हेही स्पष्ट व्हायला हवे.   - मयूर धूत  देशाची प्रगती होईल अशी आशा वाटतेयनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते आजपर्यंत जर त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला तर फार समाधानकारक असे काही झाले नाही. मात्र मेक इन इंडियापासून परत एकदा अपेक्षा वाढल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरीता केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेकविध उपक्रमांपैकी मेक इन इंडियाची घोषणा होऊन एक वर्ष झाले. आज कुठे त्याचे पहिले पाऊल दिसू लागले आहे. यापुढे तरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागू नये, अशी अपेक्षा आहे.                    - पवन पटेलफक्त विदेशी गुंतवणुकीवर देश चालेल?पंतप्रधानांनी यापूर्वीदेखील अनेकदा अशा प्रकारचे मार्केटिंग केले आहे. मोठ्या प्रमाणात ब्रॉण्डिंग करुन, जाहिराती देऊन ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होणार नाही. स्थानिक उद्योजकांना या उपक्रमापासून लांब ठेवण्यात अर्थ नाही. फक्त विदेशी गुंतवणुकीवर देश चालेला या भ्रमात कुणी राहू नये. असे कुणी करीत असेल तर माझ्या मते ही फसवणूक आहे.  - विजित पाटील 

ेआपल्या देशात सध्या 'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मेक इन इंडिया' जागराला देशाच्या आर्थिक राजधानीत प्रारंभ झाला अन् पंतप्रधान मोदींनी स्वत: जातीने उपस्थित राहून मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन केले. मुंबईला देशातील पहिला मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्याचा मान मिळाला असून मेक इन इंडियाच्या आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीतेबद्दल काही शंकाही आहेत. आपल्या शहरातील तरुणाईही या प्रकल्पाच्या सकारात्मक-नकारात्मक दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करीत आहे. त्याचा सीएनएक्सने घेतलेला हा विशेष आढावा... ‘मेक इन इंडिया’. पंतप्रधानांचा हा ड्रिम प्रोजेक्ट. हा ड्रिम प्रोजेक्ट भारताला नेमका किती फायदा करून देईल? विदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतात करुन पंतप्रधान भारतीय उद्योजकाला डावलत तर नाही ना अशा अनेक प्रश्नांकडे या तरुणाईने लक्ष वेधले. फक्त गुंतवणूक करुन होणार नाही तर त्यातून जनतेला नक्कीच लाभ मिळायला पाहिजे. ४९ देशांचे प्रतिनिधी आणि ६८ देशांतून दाखल झालेले शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. भारताकडे असलेल्या सर्व सोयी-सुविधा आम्ही गुंतवणूकदारासाठी खुल्या करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले. मात्र विदेशी गुंतवणूक वाढल्याने त्या कंपनीचे अथवा गुंतवणूकदारांचे नखरे देखील भारताला सहन करावे लागणार आहेत, याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा या तरुणाईने व्यक्त केली.