शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

1.23 अरब रूपयांची जगातील सर्वात महागडी सॅन्डल तुम्ही पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 11:38 IST

अनेकदा आपण फॅशन वर्ल्डमधील ड्रेसेस, ज्वेलरी यांच्या किंमती ऐकून थक्क होतो. जगभरातील महागडे ब्रँड आणि त्या ब्रँडच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. अशातच आणखी एका वस्तूची किंमत ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

अनेकदा आपण फॅशन वर्ल्डमधील ड्रेसेस, ज्वेलरी यांच्या किंमती ऐकून थक्क होतो. जगभरातील महागडे ब्रँड आणि त्या ब्रँडच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. अशातच आणखी एका वस्तूची किंमत ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बोलत आहोत जगातल्या सर्वात महागड्या सॅन्डलबाबत. आता तुम्ही विचारात पडला असाल ना? अनेक प्रश्नही पडले असतीलच. जाणून घेऊयात नक्की काय आहे असं या सॅन्डलमध्ये...

जगातील सर्वात महाग सॅन्डल लवकरच लॉन्च करण्यात येणार आहेत. याची किंमत जवळपास 1.7 कोटी डॉलर म्हणजेच 1.23 अरब रूपये असणार आहे. बुधवारी ही सॅन्डल संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही जगातील सर्वात महागडी सॅन्डल हिरे आणि शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. सॅन्डल डिझाइन करण्यासाठी 9 महिन्यांचा वेळ लागला आहे. 

शेकडो हिरे जडवले गेले या सॅन्डलवर

या सॅन्डलला 'पॅशन डायमंड शू' असं नाव देण्यात आलं आहे. या सॅन्डलवर शेकडो हिरे जडवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये 15-15 कॅरेटचे 2 इम्पोजिंग डी-फ्लॉलेस डायमंडसुद्धा लावण्यात आले आहेत. सॅन्डलची ही जोडी यूएईतील ब्रँड 'जदा दुबई'ने 'पॅशन ज्वेलर्स'सोबत तयार केली आहे. जदा हा ब्रँड दुबईमध्ये हिरे जडवलेल्या सॅन्डल्स तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बुधवारी जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये ही सॅन्डल लॉन्च करण्यात येणार आहे. 

विक्रीसाठी फक्त एकच जोड सॅन्डल उपलब्ध

रिपोर्ट्सनुसार, ही सॅन्डल सध्या जगातील सर्वात महागडी सॅन्डल आहे. याआधी  डेबी विन्घम हाई हील्स ही जगातील सर्वात महागडी सॅन्डल होती. तिची किंमत 1.9 अरब रूपये होती. लॉन्च इवेंटमध्ये या सॅन्डलचा प्रोटोटाइप 36EU ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोणी कस्टमर ही सॅन्डल खरेदी करेल त्याच्या पायाच्या मापानुसार ही सॅन्डल कस्टमाइज करून त्याला देण्यात येणार आहे. या सॅन्डलबाबतची खास गोष्ट म्हणजे, या पॅशन डायमंड सॅन्डलची फक्त एकच पेअर विक्रीसाठी असणार आहे. ती फक्त कस्टमरसाठी असेल जो ती सॅन्डल खरेदी करेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfashionफॅशन