नशीबवान लिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:58 IST
नशीबवान लिलीपॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अभिनेता जॉनी डैपची मुलगी लिली रोज थोडक्यात बचावली. ती पॅरिस येथे तिच्या मित्राने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती.
नशीबवान लिली
नशीबवान लिलीपॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अभिनेता जॉनी डैपची मुलगी लिली रोज थोडक्यात बचावली. ती पॅरिस येथे तिच्या मित्राने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. ज्याठिकाणी पार्टी होती, तेथून काही अंतरावरच आंतकवाद्यांनी अंधाधूंद फायरिंग केली होती. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर लिली तिच्या मित्रासोबत काही वेळातच सुरक्षित स्थळी पोहोचली. नंतर तिने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर दिली.आयुष्य नव्हे सर्कसपॉप स्टार ते फॅशन डिझायनर असा प्रवास केलेल्या विक्टोरिया बॅकहम हिने माझे आयुष्य सर्कसीप्रमाणे असल्याचे सांगितले आहे. कामातून वेळ काढून परिवारासमवेत राहणे तसे अवघड आहे. मी कधीही माझ्या परिवारापासून जास्त दूर जाणे पसंत करीत नाही, असे ती सांगते. विक्टोरियाला पती डेविड बॅकहम याच्यापासून तीन मुले व चार वर्षाची मुलगी आहे. मुलांचे पालनपोषण करणे हे आम्हा दोघांच्यादृष्टीने महत्त्वाचे असून, एकजण त्यांच्याजवळ नेहमीच असतो. त्यामुळे मला सर्कसीप्रमाणे संतूलन सांभाळावे लागते.जॉर्जची उदारताबेघरांना घर मिळावे या हेतूने सुपरस्टार जॉर्ज क्लूनी याने एका संस्थेला एक हजार डॉलरची मदत केली आहे. जॉर्ज म्हणतो की, ज्यांच्याकडे स्वत:चा निवारा नाही अशा लोकांना घर मिळायला हवे. कुटुंबासह भाड्याच्या घरात जीवनव्यतीत करणे ही साधी बाब नाही. आपलेही स्वत:चे घर असावे असे प्रत्येकांचे स्वप्न असते. अशा लोकांना आपले स्वप्न साकार करता यावे यासाठी मी ही मदत केली आहे.