शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

केस गळतीवर उपाय शोधताय? 1 चमचा मेथ्यांचा उपाय करून पाहा!

By madhuri.pethkar | Updated: November 22, 2017 16:55 IST

मेथ्या शरीरास जेवढ्या फायदेशीर तितक्याच सौंदर्योपचारातही परिणामकारक ठरतात. केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावशाली उपाय मेथ्यांमध्ये सापडतो. वेगवेगळ्या कारणांमुळे केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यासारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत.

ठळक मुद्दे* केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केस नैसर्गिकपणे सुंदर करण्यासाठी मेथ्य्यांचा चांगला उपयोग होतो.* मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, निकोटिनिक अ‍ॅसिड असतं याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो.

 

- माधुरी पेठकरथंडीत हमखास आठवतात ते मेथीचे लाडू. मेथ्यांचा कडवटपणा, गुळाचा गुळमटपणा, डिंकाचा खुसखुशीतपणा आणि सुक्यामेव्याची पौष्टिकता यागुणांनी संपन्न मेथीचे लाडू सगळ्यांनाच आवडतात. मेथ्यांचा कडूपणा मान्य करूनही हे लाडू आवडीनं आणि आवर्जून खाल्ले जातात. पण मेथ्यांचा उपयोग फक्त लाडवापुरताच मर्यादित नाही. या मेथ्या शरीरास जेवढ्या फायदेशीर तितक्याच सौंदर्योपचारातही परिणामकारक ठरतात. केसांच्या अनेक समस्यांवरचा प्रभावशाली उपाय मेथ्यांमध्ये सापडतो.

वेगवेगळ्या कारणांमुळे केस पातळ होणं, कोरडे होणं, कोंडा होणं यासारख्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांचे उपाय मेथ्यांच्या दाण्यात आहेत. उगाच बाजारातले प्रोडक्टस वापरून केसांची नासाडी करण्यापेक्षा घरगुती उपायांनी समस्या तर सुटतातच शिवाय केसांची गुणवत्ताही वाढते,.

 

 

केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केस नैसर्गिकपणे सुंदर करण्यासाठी मेथ्य्यांचा चांगला उपयोग होतो. मेथ्यांमध्ये फोलिक अ‍ॅसिड, अ, के आणि क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशिअम, कॅल्शियम, लोह यासारखी खनिजंही मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या गुणांमुळेच मेथ्या जर केसांसाठी वापरल्या तर केसांचा कोरडेपणा, कोंडा यासारख्या समस्या सहज जातात. मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेसिथिन नावाचा घटक असतो ज्यामुळे केस कोरडे होत नाही. केसांची मुळं मेथ्यांमुळे पक्की होतात.मेथ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, निकोटिनिक अ‍ॅसिड असतं याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. मेथ्या या उष्ण गुणधर्माच्या असतात. ही उष्णता कमी करून केसांसाठी त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर मेथ्या या रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. यामुळे मेथ्यांमधील उष्णता कमी होते. मेथ्यांमध्ये केसांच्या आरोग्यास पुरक असे अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टस असतात.

केस गळती थांबवण्यासाठीकेस गळतीवर उपाय म्हणून मेथ्यांचा लेप लावावा. यासाठी दोन चमचे मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात.नंतर सकाळी त्या वाटून घ्याव्यात. मेथ्यांची ही पेस्ट केसांचं उत्तम संरक्षण करते. ही पेस्ट केसांना लावावी. वीस मिनिटं ती केसांवर राहू द्यावी. केस धुण्याआधी हलक्या हातानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. आणि सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. जर केसात कोंडा असेल तर मेथ्यांच्य पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा. या पेस्टमुळे कोंडा जातो. जर केस मऊ हवे असतील तर या पेस्टमध्ये 1 चमचा नारळाचं दूध घालावं.

 

 

काळ्याभोर आणि मऊसूत केसांसाठी

दोन चमचे मेथ्या घ्याव्यात. त्या मिक्सरध्ये वाटाव्यात. मेथ्यांच्या पूडमध्ये एक चमचा खोबरेल तेल किंवा आॅलिव्ह तेल घालावं. ती पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी. नंतर ती केसांना लावावी. दहा मिनिटं ती केसांवर तशीच राहू द्यावी. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. मेथ्यांचा हा उपचार नियमित केल्यास केस उत्तम राहातात. केसांच्या सौंदर्यासाठी ब्युटी पार्लरची गरज नाही. घरात मेथ्यांचे दाणे असले तरी पुरते.