शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

पाठीवरील मुरुमांमुळे आहात त्रस्त, वाचा हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:55 AM

चेह-यावरील मुरुमांच्या समस्याप्रमाणेच पाठीवर येणा-या मुरुमांमुळेही बहुतांश लोकं त्रासलेले असतात. पाठीवर मुरुमं येणे ही देखील एक मोठी समस्या आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - चेह-यावरील मुरुमांच्या समस्याप्रमाणेच पाठीवर येणा-या मुरुमांमुळेही बहुतांश लोकं त्रासलेले असतात. पाठीवर मुरुमं येणे ही देखील एक मोठी समस्या आहे. पाठीवर येणा-या मुरुमांना बॅक अॅक्ने असंही म्हणतात.  पाठीवरील मुरुमांमुळे हवे तसे कपडे, फॅशन करायला मिळत नाही, अशी ब-याच महिलांची तक्रार असते. साधारणतः पाठीवरील मुरुमं दिसत नाहीत, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत घाम व धुळीमुळे मुरुमं भयानक स्वरुपात दिसू लागतात. 
 
पाठीवरील मुरुमांची समस्या अधिकतर महिलांमध्ये दिसून येते. एका सर्व्हेक्षणानुसार, 20 वयोवर्षातील 50 टक्के महिला आणि 40 टक्के पुरुष या समस्येमुळे हैराण असतात. ही समस्या कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहूया. यामुळे तुमची ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. पाठीवरील मुरुमांची समस्या साधारणतः कमी पौष्टिक खाल्ल्यानं, अधिक प्रमाणात तिखट पदार्थाचं सेवन केल्याने व मानसिक तणावामुळे उद्भवते.  याशिवाय गर्भावस्थेदरम्यान व मासिक पाळीत शरीरातील हार्मोन्स बदलतात,यामुळेदेखील पाठीवर मुरुमं येतात.
 
1. जवाचे पीठ 
पाठीवरील मुरुमांची समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास जवाचे पीठ बरेच फायदेशीर आहे. जवाचे पीठ शिजवून त्यात मध टाकून मिश्रण तयार करावे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण पाठीवर लावावे व अर्धा तास ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे
 
2. कोरफडीची लेप
एका वाटीत कोरफडीचा लेप घ्यावा त्यात टोमॅटो वाटून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मुरुमं असलेल्या जागेवर अर्धा तास लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुऊन पाठ स्वच्छ करुन घ्यावी. 
 
3. तुळस-पुदिन्याचा लेप 
तुळस-पुदिन्याचा लेप लावल्यानंही पाठीवरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. एका भांड्यात तुळस-पुदिन्याच्या पानं घेऊन त्यात थोडीशी हळद व मुलतानी माती मिळवून लेप तयार करावा. हा लेप पाठीवर 15 मिनिटं लावून ठेवावा व कोमट पाण्यानं पाठ स्वच्छ धुवावी. 
 
4. फळं-हिरव्या भाज्या खाव्यात
याशिवाय आहारात फळं व हिरव्या भाज्यांच्या समावेश वाढवावा. पाणी अधिक प्यावे.  या उपायांमुळे नक्कीच पाठीवर येणा-या मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल.