डावखुरे लोक असतात अधिक 'स्मार्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:05 IST
एकूण जागतिक लोकसंख्येच्या केवळ चार टक्के लोक डावखुरे आहेत. काही लोक डाव्या हाताने काम करणे अशुभ किंवा चुकीचे मानत असतात
डावखुरे लोक असतात अधिक 'स्मार्ट'
त्यामुळे लहानपणी मुलांना उजव्या हाताने काम करण्याची जबरदस्तीने सवय लावली जाते. मात्र याविषयावर झालेल्या संशोधनातून असे दिसून आले की डावखुरे असण्याचे खूप फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'सृजनशीलता' (क्रिएटिव्हिटी). प्रत्येक व्यक्ती हा विशिष्ट गुणविशेषांमुळे युनिक असते. मात्र १९९५ साली मानसशास्त्रज्ञ स्टॅन्ली कोरेन यांनी केलेल्या विविध प्रयोगांतून सिद्ध झाले की डावखुरे लोकांची विचारशक्ती फार जलद आणि क्रिएटिव्ह असते. माहितीचे विश्लेषण करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त क्षमता असते.खास करून डावखुर्या पुरुषांमध्ये भिन्न विचार करण्याची क्षमता उजव्यापेक्षा अधिक असते.एका प्रयोगामध्ये एक हजार स्त्री-पुरुषांना एकत्र वापर न करण्यात येणार्या वस्तुंच्या जोड्या लावण्यास सांगितले तर दुसर्या प्रयोगात दिलेल्या शब्दांची शक्य तितक्या गटांत वर्गवारी करायची होती. यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे कोरेन यांनी निष्कर्ष काढला की डावखुरे पुरुष उजव्या पुरुषांपेक्षा डायव्हर्जंट थिकिंगमध्ये अधिक सरस ठरले. मात्र स्त्रियांच्या बाबतीत हा फरक दिसून नाही आला.