चांगल्या भूमिकांसाठी लॉरेन्सचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:36 IST
चांगल्या भूमिका मिळविण्यासाठी हॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागतो.
चांगल्या भूमिकांसाठी लॉरेन्सचा संघर्ष
ऑस्कर अवॉर्ड विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स म्हणाली, चांगल्या भूमिका मिळविण्यासाठी हॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागतो. स्वत:च स्वत:चा योग्य मार्ग निवडावा लागतो.जेनिफरने नुकताच लॉॅस एंजेलिस येथे तिचा नवा चित्रपट 'द हंगर गेम्स : मॉकिंगजे भाग २' विषयी पत्रकारांशी संवाद साधला. या महिन्याच्या सुरुवातीला तिने हॉलिवूडमध्ये स्त्री- पुरूष भेदभाव केला जात असल्याचा आरोप जाहीर पत्रातून केला होता.ती म्हणाली, आधी भूमिका मिळवताना संघर्ष करावा लागायचा. आता मात्र नाव झाल्यावर आधीसारखा त्रास होत नाही.