लेडी गागा मार्क जेकबच्या शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 01:07 IST
लेडी गागा हिने नुकतेच न्यूयॉर्क फॅशन शोच्या अंतर्गत मार्क जेकब यांच्या शोमध्ये सहभाग घेतला.
लेडी गागा मार्क जेकबच्या शोमध्ये
अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री, गीतकार २९ वर्षीय लेडी गागा हिने नुकतेच न्यूयॉर्क फॅशन शोच्या अंतर्गत मार्क जेकब यांच्या शोमध्ये सहभाग घेतला. फॅशन शो मध्ये हा तिचा पहिलाच सहभाग होता.गोल्डन ग्लोब विजेत्या गागावर साºयांच्याच नजरा खिळल्या होत्या. ’ द बॅड रोमान्स ’ची गायिका तिच्या नावीन्यपूणर पोशाखात अगदी दिलखेचक वाटत होती. तिने तिच्या या सहभागाची काही छायाचित्रे नुकतीच इन्स्टाग्रामवर शेयर केली आहेत. शोसाठी तिने किती तयारी केली होती, हे या छायाचित्रांमधून कळते. कॅटवाकचीही काही छायाचित्रे तिने शेयर केली आहेत.