‘कृष्णदासी’ मालिकेची अॅक्ट्रेस आहे..मराठी मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 06:27 IST
‘कृष्णदासी’ ही मालिका अलिकडेच नव्या विषयाला घेऊन सुरू झाली आहे.
‘कृष्णदासी’ मालिकेची अॅक्ट्रेस आहे..मराठी मुलगी
‘कृष्णदासी’ ही मालिका अलिकडेच नव्या विषयाला घेऊन सुरू झाली आहे. देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी, तुलसी आणि आराध्या नावाच्या स्त्री नायिकांवर तयार करण्यात आली आहे. या मालिकेत राहुल मेहंदळे आणि उदय टिकेकर यांच्यासह आणखी एक मराठमोळा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, तो चेहरा म्हणजे अभिनेत्री श्र्वेता महाडिक हिचा. श्र्वेता मुळची मुंबईची, तिला बालपणापासूनच अभिनयाची खूप आवड म्हणून ती महाविद्यालयीन जीवनातच वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असे. रुईया महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असताना ती एकांकिका व विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली. त्याचा फायदा तिला अभिनय क्षेत्रात झाला.