किमला मुलांचा सांभाळ करणे झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:38 IST
टेलीव्हिजन रिअॅलिटी स्टार किम कर्दशियाचे म्हणणे आहे की, तिची दोन वर्षाची मुलगी नॉर्थला छोटा भाऊ सेंटचा तिरस्कार वाटतो.
किमला मुलांचा सांभाळ करणे झाले कठीण
टेलीव्हिजन रिअॅलिटी स्टार किम कर्दशियाचे म्हणणे आहे की, तिची दोन वर्षाची मुलगी नॉर्थला छोटा भाऊ सेंटचा तिरस्कार वाटतो. सेंट सध्या चार महिन्याचा असून, नॉर्थला त्याच्यासोबत वेळ व्यतीत करणे फारसे आवडत नाही. नाइटक्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना तिने ही माहिती दिली. ती म्हणाली की, माझी मुलगी अजुनही तिच्या लहान भावाचा तिरस्कार करीत आहे. त्यामुळे तिला सांभाळताना मला बºयाचशा अडचणी येत आहेत. त्यामुळे मला सेंटबरोबर चोरून-लपुन वेळ व्यतीत करावा लागत आहे. यात मला माझ्या पतीची प्रचंड मदत होत असल्याचेही किमने सांगितले.