शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

इंटरव्ह्यू देताना हातवारे जरा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:29 IST

​जॉन मॉलिडोर आणि बार्बरा पारुस यांनी 'क्रेझी गुड इंटरव्ह्युविंग' नावाच्या पुस्तकात याविषयी लिहिले आहे.

जॉब इंटरव्ह्यूव म्हणजे जरा टेंशनचीच गोष्ट आहे. कसे बसावे, काय बोलावे, कोणाशी सर्वात आधी हात मिळावा असे एक ना अनेक प्रश्न अक्षरश: छळ करतात आपला. नोकरीचा प्रश्न असल्याने आपण नर्व्हस असतो. मग अशा वेळी सुरू होते आपल्या हाताची हालचाल.मुलाखत देताना घडीकडे पाहणे, खिशात हात टाकू न चावीशी खेळणे, विशिष्ट हातवारे करणे आपले इम्प्रेशन खराब करू शकते. त्यामुळे हातांचा जर नीट उपयोग केला तर नोकरी मिळण्याचे चान्सेसही वाढू शकातात.जॉन मॉलिडोर आणि बार्बरा पारुस यांनी 'क्रेझी गुड इंटरव्ह्युविंग' नावाच्या पुस्तकात याविषयी लिहिले आहे. बघा, काय म्हणतात ते..१. हाताचे तळवे लपवू नका : उघडपणे हाताचे तळवे दाखवल्याने तुमचा प्रामाणिकपणा दिसतो. याचा संबंध तुमच्या खरेपणा, विश्‍वासूपणाशी असतो, असे बार्बरा व अँलन पीज यांनी म्हटले आहे. इतिहासामध्येसुद्धा उघड्या हाताचा अर्थ धोका किंवा दगाबाजी न करण्याचा हेतू नसणे असा आहे.२. बोटांचा त्रिकोण बनवा : दोन्ही हातांचे बोटं जोडून बनवलेल्या त्रिकोणातून तुमचा आत्मविश्‍वास झळकतो. कार्लाेस किन्से गोमन म्हणतात की, राजकीय नेते आणि एक्झिक्युटिव्ह जेव्हा एखाद्या मुद्यावर जोर देतात तेव्हा अशा प्रकारे त्रिकोण तयार करतात.३. हाताचा तळवा खालच्या दिशेने नको : समोरच्या व्यक्तीशी हात मिळवाताना कधीही आपल्या हाताचा तळवा खालच्या दिशेने असू नये. यामुळे आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचे आहे असे दिसते. त्यामुळे ही चूक करू नका.४. खिशात हात नका ठेवू : तुम्ही जर खिशात हात टाकू न बोलत असाल तर याचा अर्थ तुम्ही काही तरी लपून ठेवत आहात. समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. तुमचा हेतू प्रामाणिक नाही असा याचा अर्थ होतो.५. उगीच हातवारे करू नका : बोलताना उगीच हातवारे केल्यामुळे तुम्हाल तुमच्या बोलण्यावर विश्‍वास नाही, असा होऊ शकतो. एका ठराविक प्रमाणात आणि मुद्याला अनुसरूनच हाताचे इशारे केले पाहिजेत.६. बोटाने टॅप करू नका : टेबल, खुर्चीवर बोटोने टकटक आवाज केला तर त्यातून तुमची अस्वस्थताच दिसून येते.