‘द जंगल बुक’ची उत्तर अमेरिकेत जोरदार मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 16:51 IST
डिजनीचा थ्री डी अॅक्शन कॉम्पुटर अॅनिमेटेड चित्रपट ‘द जंगल बुक’ने उत्तर अमेरिकेत जबरदस्त ओपनिंग केली आहे. बॉक्स आॅफीसचा रिव्ह्यू घेणाºया ‘कॉमस्कोर’नुसार पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०.३६ कोटी डॉलरचा बिझनेस केला.
‘द जंगल बुक’ची उत्तर अमेरिकेत जोरदार मुसंडी
डिजनीचा थ्री डी अॅक्शन कॉम्पुटर अॅनिमेटेड चित्रपट ‘द जंगल बुक’ने उत्तर अमेरिकेत जबरदस्त ओपनिंग केली आहे. बॉक्स आॅफीसचा रिव्ह्यू घेणाºया ‘कॉमस्कोर’नुसार पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०.३६ कोटी डॉलरचा बिझनेस केला. त्याचबरोबर वर्षातील तीसºया स्थानावरील सर्वाधिक ओपनिंगचा रेकॉर्डही केला. कारण या अगोदर बॅटमॅन वि. सुपरमॅन (१६.६. कोटी डॉलर) आणि डेडपूल (१३.२४ कोटी डॉलर) या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला महिला वर्गाकडून अधिक पसंती मिळत आहे. कारण एकुण प्रेक्षकांपैकी ५१ टक्के महिला आहेत. वयाचा विचार केल्यास चित्रपटाला २५ वर्षापेक्षा अधिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. ज्यांचा आकडा ५३ टक्के आहे. तर उर्वरित प्रेक्षकांमध्ये ४९ टक्के फॅमिली प्रेक्षकांचा समावेश आहे. द जंगल बुक हा चित्रपट पुढील काही आठवड्यात कमाईच्या बाबतीत पहिल्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने जगभरात चालू आठवड्यात २३.९७ कोटी डॉलरची आतापर्यंत कमाई केली आहे.