जेनिफरला मिस करतात तिचे फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:13 IST
हॉलीवुड अॅक्ट्रेस आणि सिंगर जेनिफर लोपेज सध्या अमेरिकन आयडल या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती जज्च्या भूमिकेत असून, सध्या शो अंतिम टप्प्यात आहे.
जेनिफरला मिस करतात तिचे फॅन्स
हॉलीवुड अॅक्ट्रेस आणि सिंगर जेनिफर लोपेज सध्या अमेरिकन आयडल या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती जज्च्या भूमिकेत असून, सध्या शो अंतिम टप्प्यात आहे. अशात जेनिफरच्या फॅन्स क्लबने ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून, त्याखाली ‘आता या तिघांची आम्हाला खुप आठवण येईल’ असे लिहले आहे. फोटोत जेनिफर, कीथ अर्बन, हॅरी कोनिक दिसत आहेत. त्यानंतर जेनिफरने देखील स्वत:च्या ट्विटर अकाऊंट हा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे या शोमध्ये भावनिकता पसरली असून, जेनिफरला आम्हीही खुप मिस करणार असल्याचे स्पर्धकांनी सांगितले आहे.