जेनिफरची पुन्हा टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:07 IST
अभिनेत्री जेनिफर लॉरेंसने हॉलीवुड कलाकारांना चित्रपटात अभिनयासाठी नव्हे तर केवळ दिखावा करण्यासाठी संधी दिली जात असल्याची टीका पुन्हा केली आहे.
जेनिफरची पुन्हा टीका
अभिनेत्री जेनिफर लॉरेंसने हॉलीवुड कलाकारांना चित्रपटात अभिनयासाठी नव्हे तर केवळ दिखावा करण्यासाठी संधी दिली जात असल्याची टीका पुन्हा केली आहे. ती म्हणते की, चित्रपटात कलाकारांना त्यांची अभिनय क्षमता लक्षात घेवून संधी द्यायला हवी. मात्र असे होत नाही. केवळ प्रतिष्ठा आणि पैसा या दोनच बाबींवर कलाकार चित्रपटात झळकतात. हे मला अजिबात पसंत नसून, मला देखील अशाप्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र मी त्यावेळेस याला विरोध दर्शविल्याचे आज समाधान वाटते.