जॅकलिनची Adult comedy चित्रपटात काम करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:19 IST
‘मी प्रौढ विनोदी चित्रपटात काम करू शकते, अट फक्त एवढीच आहे की, चित्रपट रुचीपूर्ण असावा आणि चांगल्याप्रकारे दिग्दर्शित असावा’, असे जॅकलिनने जाहिर
जॅकलिनची Adult comedy चित्रपटात काम करण्याची तयारी
‘मी प्रौढ विनोदी चित्रपटात काम करू शकते, अट फक्त एवढीच आहे की, चित्रपट रुचीपूर्ण असावा आणि चांगल्याप्रकारे दिग्दर्शित असावा’, असे जॅकलिनने जाहिर करून जणू एकप्रकारे बोल्डनेस असलेल्या चित्रपटांमधून भूमिका साकारण्यास हिरवा झेंडा दाखविला आहे. पूढे ती म्हणाली, चित्रपट कोण बनवत आहे आणि कशाप्रकारे बनत आहे हे खूप महत्वाचे आहे. हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आपण तयार असून, संधी मिळाल्यास मी नक्कीच हॉलिवूडपटात अभिनय करेन, असेही ती म्हणाली. आपण अशा युगात राहतो, जिथे सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगत होत आहे. कलाकारांचा स्तरदेखील उंचावत आहे. निरनिराळ्या चित्रपटांचा भाग होणे मी पसंत करेन. विविध कलाकारांसोबत चित्रपट करणे खूप गंमतीशीर आहे. मी टोरॅन्टो आणि ब्रिटिश चित्रपटांमधून अभिनय केला आहे. अशी संधी मिळणे ही खूप चांगली बाब असल्याचे मत तिने व्यक्त केले. रोहित धवनच्या ‘ढिशुम’ या आगामी चित्रपटात ती जॉन अॅब्राहम आणि अक्षय खन्नासोबत दिसेल.