क्रू मेंबरसोबत जॅकीचे बर्थ-डे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:32 IST
हॉलीवुड अभिनेता जॅकी चैन याने त्याचा बर्थ-डे तीन दिवस अगोदरच जोधपूर येथील सूर्यनगरीमध्ये क्रू मेंबरसोबत सेलिब्रेट केला.
क्रू मेंबरसोबत जॅकीचे बर्थ-डे सेलिब्रेशन
हॉलीवुड अभिनेता जॅकी चैन याने त्याचा बर्थ-डे तीन दिवस अगोदरच जोधपूर येथील सूर्यनगरीमध्ये क्रू मेंबरसोबत सेलिब्रेट केला. यावेळी जॅकीने राजस्थानी जेवनाचा आस्वाद घेत राजस्थानी नृत्याचा भरपुर आनंद घेतला. पाच दिवस चाललेल्या या शूटिंग दरम्यान जॅकीला येथील संस्कृती चांगलीच भावली. ‘कुंग फू योगा’ या चित्रपटातील एक गाणे शुट करण्यासाठी जॅकी राजस्थानला पोहचला होता. येथील पारंपारिक मंदिरे, संस्कृती बघुन तो थक्क झाला होता. त्यामुळेच त्याने एका मंदिरात प्रवेश करताना आपले शुज बाहेर काढले. शिवाय बराच वेळ तो कडक उन्ह्यात मंदिराच्या सभोवताली अनवानी पायाने फिरत होता.