बास्केटबॉल खेळाडू प्रतिमासोबत ईशांत शर्माचा साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 22:08 IST
टीम इंडियाचा फास्ट बॉलर ईशांत शर्मा याचा साखरपुडा आज रविवारी पार पडला. एका घरगुती सोहळ्यात ईशांतने प्रतिमा सिंह हिला एन्गेजमेंट रिंग घातली.
बास्केटबॉल खेळाडू प्रतिमासोबत ईशांत शर्माचा साखरपुडा
टीम इंडियाचा फास्ट बॉलर ईशांत शर्मा याचा साखरपुडा आज रविवारी पार पडला. एका घरगुती सोहळ्यात ईशांतने प्रतिमा सिंह हिला एन्गेजमेंट रिंग घातली. या साखरपुड्यानंतर ईशांत आणि प्रतिमा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण या वर्षाच्या अखेरिस हा सोहळा होईल, अशी शक्यता आहे. ईशांतची भावी वधू बास्केटबॉल प्लेअर आहे. वाराणसीची राहणारी प्रतिमा इंडियन नॅशनल बास्केटबॉल टीमची प्लेअर आहे. प्रतिमासह तिच्या चार बहीणीही बास्केटबॉल प्लेअरच आहेत. यांना बास्केटबॉल खेळाडू ‘सिंह सिस्टर्स’ म्हणून ओळखतात.