मराठीवरून राजकारण करण्यापेक्षा मराठी चित्रपट देशभर पोहचवा- आर.बाल्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 13:23 IST
मराठी भाषेबद्दल ओरड करणाºयांनी तोच पैसा आपले दर्जेदार मराठी चित्रपट देशभर पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,
मराठीवरून राजकारण करण्यापेक्षा मराठी चित्रपट देशभर पोहचवा- आर.बाल्की
मराठी भाषेबद्दल ओरड करणाऱ्यांनी तोच पैसा आपले दर्जेदार मराठी चित्रपट देशभर पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की यांनी मराठीवरून राजकारण करणाऱ्यांना सुनावले. आर.बाल्की हे मुळ तमिळ मात्र गेल्या काही वर्षात त्यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शनात लौकिक मिळविला आहे. सध्या देशभरात चांगला सिनेमा हा मराठी भाषेतच पाहायला मिळतो, असे मत व्यक्त करून मराठी चित्रपट जगभरात पोहचवले पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. बाल्की हे मराठी चित्रपटाचे निस्सीम चाहते असून ‘टिंग्या’, ‘गाभ्रीचा पाऊस’ तर ‘नटसम्राट’ असे सर्व चित्रपट पाहिले आहेत. ‘बालगंधर्व’ हा चित्रपट त्यांनी अमेरिकेत पाहिला होता.