शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:11 IST

यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय करण्याचे धाडस करणे ही खर...

यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय करण्याचे धाडस करणे ही खरोखरच फार मोठी गोष्टी आहे. बिझनेस वृद्धीसाठी अनेक व्यावसायिक दिवसरात्र एक करून घाम गाळतात. कामाचा व्याप इतका असतो की महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र यशस्वी उद्योजक तेच असतात जे कितीही व्यग्र असले तरी पुढील पाच सवयींना विसरत नाहीत.१. ठराविक दिनचर्याकोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी स्वत:ला शिस्त लावणे फार गरजेचे असते. शिस्तीने रोजचा दिनक्रम ठरवल्यामुळे कामे करण्यास बरोबर वेळ मिळतो. स्वयंद्योजक हे जाणतात म्हणून ते स्वत:च्या गरजा आणि वेळ ओळखून दिनक्रम निश्‍चित करतात.२. व्यायामव्यायामाचे महत्त्व आता वेगळे सांगण्याची काही गरज नाही. जगातील टॉप सीईओ व्यायामाला विशेष प्राधान्य देतात. अँपल, झेरॉक्स, पेप्सी आणि स्टारवूड हॉटेल्सचे सीईओ दिवसाची सुरुवात जिममध्ये घाम गाळूनच करतात. योगामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते असे त्यांचे म्हणणे आहे.३. कामगिरीवर लक्षबरेच लोक कामात एवढे गर्क होतात की एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची विसरतात. ती म्हणजे स्वत:ची कामगिरी तपासणे. आपण ठरवलेले ध्येय गाठले का, अजून किती काम बाकी आहे, आपली स्ट्रेंग्थ काय, या सर्व गोष्टींवर तुम्ही रोजच्या रोज लक्ष दिले पाहिजे.४. कुटुंबीयांसोबत वेळयशस्वी लोक आपल्या परिवाराला वेळ देण्यास प्राधान्य देतात. कितीही व्यग्र असले तरी दिवसातून काही काळ ते आपल्या मुलांसाठी, पत्नीसाठी जरूर काढतात. यामुळे अजून जोमाने काम करण्याची शक्ती आणि प्रेरणा त्यांना मिळते.५. भविष्यावर नजरयशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ आज काय चालू आहे यावर लक्ष देणे पुरेसे नाही. उद्यावर नजर ठेवून भविष्याचा अंदाज बांधणारे लोकच आयुष्यात सक्सेसफुल ठरतात. क्षणाक्षणाला बदलणार्‍या या जगाचा अचूक वेध घेणे तुम्हाला जमले पाहिजे.