सहकार्यांचा अविश्वास कसा ओळखाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:22 IST
सहकार्यांचा अविश्वास ओळखणार कसा? याचे उत्तर फार सोपे आहे.
सहकार्यांचा अविश्वास कसा ओळखाल?
ऑफिसमध्ये काम करत असताना टीमवर्क फार महत्त्वाचे असते. त्यासाठी सहकार्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. परंतु बर्याच वेळा असे होते की सहकार्यांचा तुमच्यावर विश्वास नसतो आणि ते तसा उघडपण दाखवतील असेही नाही. अशामुळे तुमच्या कामावर विपरित परिणाम होऊन जॉब जाण्याचाही धोका असतो.या विषयावर लिन टेलर यांनी 'टेम युअर टेरिबल ऑफिस टायरंट : हाऊ टू मॅनेज चाईल्डिश बॉस बिहेव्हिएअर अँड थ्राईव्ह इन युअर जॉब' नावाचे पुस्तक लिहिले आहे.त्यात ते म्हणतात की, सहकारी जर तुमच्यावर विश्वास करत नसतील तर तुमच्या प्रगतीला अडथळा येऊ शकतो. योग्यवेळीच हे समजून त्यांचा विश्वास संपादन करणे उचित ठरेल.मात्र सहकार्यांचा अविश्वास ओळखणार कसा? याचे उत्तर फार सोपे आहे. जर सहकारी तुमच्यावर विसंबून राहत नसतील तर समजून जावे की त्यांना तुमच्यावर विश्वास नाही.ही प्रतिमा बदलायची असेल तर कोणतेही काम करण्यास तुम्ही कार्यक्षम आहात, केवळ कारणे देणे तुमचा स्वभाव नाही अशी इमेज तुम्हाला तयार करावी लागते. तरच तुम्ही प्रोफेशनली प्रगती करू शकता.