मोकाट कुत्र्यांचा टेनिस कोर्टवर सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:58 IST
ब्राझील ओपन टूर्नामेंटच्या एका मॅच दरम्यान अशा प्रकारे प्रशिक्षित केलेल्या चार कुत्र्यांना ‘बॉल बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
मोकाट कुत्र्यांचा टेनिस कोर्टवर सन्मान
मोकाट कुत्र्यांची समस्या जगभरामध्ये सगळीकडेच आहे. दिवसभर रस्त्यांवर फि रणाºया या कुत्र्यांना काही देशांमध्ये इंजेक्शन देऊन मारलेदेखील जाते. अशी हिंसा थांबविण्यासाठी ब्राझीलमधील कुत्र्यांसाठी असणाºया निवारागृहाने अभिनव उपक्रम राबविला आहे.मोकाट कुत्र्यांना निवारागृहामध्ये भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना दत्तक घेण्यालायक बनविण्याची मोहिम साऊ पाऊलो शहरातील डॉग शेल्टरने सुरू केली आहे. नुकतेच ब्राझील ओपन टूर्नामेंटच्या एका मॅच दरम्यान अशा प्रकारे प्रशिक्षित केलेल्या चार कुत्र्यांना ‘बॉल बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. स्पेनच्या रॉबेर्तो कार्बेल्स बेएना आणि पोर्तुगालच्य गॅस्टेओ एलियास दरम्यान झालेल्या या मैत्रीपूर्ण मॅचमध्ये फ्रिडा, कोस्टेला, मेल आणि इझाबेला या चार कुत्र्यांनी कोर्टच्या बाहेर गेलेले बॉल परत आणून देण्याचे काम केले.अँड्रीया बेकेर्ट यांनी कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. मोकाट कुत्र्यांचे पुनर्वसन करून त्यांना पे्रम, माया, जिव्हाळा आणि समाजाकडून आपलेपणाची भावना मिळावी या हेतूने हा सामना ठेवण्यात आला होता. बेकर्ट सांगते, रस्त्यांवरील खडतर जीवनाचा अनुभव घेतलेल्या या कुत्र्यांना सुरूवातीला अशा सुरक्षित वातावरणाशी जुळवून घ्यायला अवघड जाते.