अर्ध्या रात्री कतरिना हॉस्पिटलमध्ये..पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:15 IST
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अर्ध्या रात्री मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये जाताना पाहिलं गेलं आणि विविध चर्चांणा उधाण आलं.
अर्ध्या रात्री कतरिना हॉस्पिटलमध्ये..पण का?
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अर्ध्या रात्री मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये जाताना पाहिलं गेलं आणि विविध चर्चांणा उधाण आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बदलत्या तपमानाचा परिणाम कतरिनाच्या तब्येतीवर झालाय... आणि याचमुळे तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलंय. 'जग्गा जासूस' या चित्रपटाचं शुटींग सध्या मोरोक्को, मुंबई आणि लंडन अशा वेगवेगळ्या परिसरात सुरू आहे. त्यामुळे, मुंबई आणि मोरोक्को मध्ये वातावरण गरम आहे... तर लंडनमध्ये कडाक्याची थंडी... अशा वातावरणात चित्रपटाचं शुटींग सुरू आहे... त्यामुळेच कतरिनाला हे वातावरण सहन होत नाहीय. त्यामुळेच, खार हॉस्पीटलच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये कतरिनानं जवळपास ४५ मिनिटे चेकअपसाठी घेतली... त्यानंतर ती घरी परतली.