ग्रॅमी अवॉर्डला रिहाना अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 01:06 IST
ट्विटरवरून चाहत्यांची माफी मागितली
ग्रॅमी अवॉर्डला रिहाना अनुपस्थित
जगप्रसिद्ध ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात परफॉर्म करणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. या स्वप्नपूतीर्चे भाग्य फार कमी कलाकारांच्या वाट्याला येते. मात्र अशी सुवर्णसंधी लाभूनही स्टार गायिका रिहाना हिला आपला परफॉर्मनन्स रद्द करावा लागला. ५८व्या ग्रॅमी सोहळ्यात ती 'अँटी' या अल्बम मधील 'किस इट बेटर' हे गाणे गाणार होती. मात्र घशाची समस्या उद्भवल्याने तिने यातून माघार घेतली. २७ वर्षीय रिहानाने याबाबत ट्विटरवरून चाहत्यांची माफी मागितली आहे.