डिकॅप्रियोला अनमोल भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 17:01 IST
रुसी चित्रपट कलाकारांनी ‘द रेवनेंट’मधील लियोनाडरे डिकॅप्रियोच्या यशस्वी भूमिकेचे सेलिब्रेशन करताना डिकॅप्रियोला आॅस्करची प्रतिकृति भेट म्हणून दिली आहे. ही प्रतिकृति शांतीचे प्रतिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
डिकॅप्रियोला अनमोल भेट
रुसी चित्रपट कलाकारांनी ‘द रेवनेंट’मधील लियोनाडरे डिकॅप्रियोच्या यशस्वी भूमिकेचे सेलिब्रेशन करताना डिकॅप्रियोला आॅस्करची प्रतिकृति भेट म्हणून दिली आहे. ही प्रतिकृति शांतीचे प्रतिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. डिकॅप्रियोने या अनमोल भेटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याखाली त्याने लिहले की, या अनमोल भेटीसाठी मी सर्व याकूतिया लोकांचे मनापासून आभार मानतो. त्यातही ही प्रतिकृति तयार करण्यासाठी ज्या महिलांनी साहित्य दान केले, त्यांचा मी सदैव ऋणी असेल. याकुतिया केवळ रूसमधीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक थंड ठिकाण आहे. हा परिसर जलवायु परिवर्तनासाठी प्रचंड संवेदनशील आहे. तापमान वाढीमुळे येथील लोकांच्या राहणीमानात बदल झाला असून, तो त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. ही प्रतिकृती निर्माण करण्यासाठी याकूतियाच्या स्थानिक महिलांनी त्यांचे आभूषणे दान दिल्याचेही डिकॅप्रियोने स्पष्ट केले.