एका वर्षांच्या चिमुकल्याने केली 4 जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 04:44 IST
1 वर्षाच्या चिमुकल्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर 4 जणांची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
एका वर्षांच्या चिमुकल्याने केली 4 जणांची हत्या
इजिप्तची राजधानी कौरो येथील एका न्यायलयाने सामूहिक हत्याकांड प्रकरणावर निर्णय देताना 1 वर्षाच्या चिमुकल्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर 4 जणांची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अहमद मन्सूर कर्मी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. गुन्ह्याच्या वेळी तो केवळ एक वर्षाचा होता. अहमदवर चौघांची हत्या, आठ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणे आणि जवान तसेच पोलिसांना धमकावणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.2014 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांप्रकरणी पश्चिम कैरोमध्ये 115 आरोपींना सामुहिकरित्या जन्मठेपेची सुनावणी करण्यात आली. त्यापैकी अहमद हा एक आहे. दरम्यान, अहमदचे वकील फैजल-अल सय्यद यांनी अहमदचे नाव न्यायालयाकडून नजरचुकीने आरोपींच्या यादीत समाविष्ट झाल्याचे म्हटले आहे.तसेच आपण ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र न्यायालयाने शिक्षा सुनावण्याच्या वेळी आरोपींच्या वयाचा विचार करायला हवा होता असा सूर उमटू लागला आहे.