शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

'फॉच्यरुन'च्या यादीत भारतीय वंशाचे 5 तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:28 IST

दिव्या सूर्यदेवरा : पाच भारतीयांपैकी सर्वांत आघाडीवर असलेले हे नाव.

दिव्या सूर्यदेवरा : पाच भारतीयांपैकी सर्वांत आघाडीवर असलेले हे नाव. त्यांना 40 जणांच्या यादीत चौथा क्रमांक देण्यात आला आहे. जनरल मोटर्स असेट मॅनेजमेंटमध्ये त्या सरव्यवस्थापक आणि सीईओदेखील आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असून त्या आधी याच कंपनीत 2013 पासून सीआयओ होत्या. 2014 मध्ये त्या सीईओ झाल्या. 36 वर्षीय दिव्या या मूळच्या चेन्नई येथील आहेत.वसंत नरसिम्हन : नरसिम्हन यांचा या यादीत सातवा क्रमांक आहे. स्वीस फार्मास्युटिकल्सच्या नोवार्टिस विभागाचे ते जागतिक प्रमुख (विकास) म्हणून मागच्या वर्षीपासून काम पाहात आहेत. ते औषधी विकास कार्यक्रम राबवितात. यात 966 कर्मचारी असून 143 प्रकल्पांचा समावेश आहे. यात 500 औषधांची चाचणी केली जाते. आठ वर्षांपूर्वी त्यांनी या कंपनीत पाऊल ठेवले होते.आनंद स्वामीनाथन : स्वामीनाथन हे असेंचर डिजिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यादीत त्यांचा क्रमांक 18 वा आहे. नवीन व्यवसायसंधी शोधणे, निर्माण करणे, पुढील वर्षांची ध्येयधोरणे आखणे आदींची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या युनिटमध्ये 30,000 लोक कार्यरत आहेत. या कंपनीत त्यांनी तब्बल 19 वर्षे घालविली आहेत. आतापर्यंत त्यांनी 45 पेक्षा जास्त व्यावसायिकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे.अपूर्व मेहता: मेहता यांनी 2012मध्ये इन्स्टाकार्टची स्थापना केली. तेव्हा ते केवळ 26 वर्षांचे होते आणि अँमेझानमध्ये कार्यरत होते. इन्स्टाकार्ट ही ऑनलाईन मार्केटिंग कंपनी आहे. प्रामुख्याने दैनंदिन वापराच्या वस्तू पुरवण्याचे काम ही कंपनी करते. या यादीत मेहता यांचा क्रमांक 23वा आहे. यापूर्वी फोर्ब्सच्या '30 अंडर 30' मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. मूळचे ते विद्युत अभियंता असून वाटर्लू विद्यापीठाचे पदवीधर आहेत.रेशमा सौजनी : रेशमा या 'गर्ल्स हू कोड'च्या संस्थापक आहेत. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या मुलींना मार्गदर्शन करणारी ही कंपनी आहे. रेशमा यांनी येल विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली असून त्या सध्या 39 वर्षांच्या आहेत. त्यांनी पाच वर्षांआधी अमेरिकेच्या राजकारणातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. व्यापार क्षेत्रात अत्यंत प्रभावशाली कामगिरी करणार्‍या तरुणांची 'फॉच्यरुन'च्या '40 अंडर 40' यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये समाविष्ट होण्याचा बहुमान पाच भारतीय वंशाच्या तरुणांनी मिळवला आहे. यापैकी दोघांनी अमेरिकन व्यापार क्षेत्रात आपला जम बसविला आहे. मुख्य म्हणजे या पाच जणांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दिव्या सूर्यदेवरा (सरव्यवस्थापक, जनरल मोटर्स असेट मॅनेजमेंट) आणि रेशमा सौजनी (गर्ल्स हू कोड) या दोघींशिवाय आनंद स्वामीनाथन (अँकसेंचर डिजिटल), अपूर्व मेहता (इन्स्टाकार्ट) आणि वदंत नरसिम्हन (नोवार्टिस फार्मास्युटिकल्स) यांचा या यादीत समावेश आहे. मुख्य म्हणजे ही पाचही नावे प्रथमच समाविष्ट झाली आहेत. मागील वर्षी भारतीय वंशाच्या चार जणांचा या यादीत समावेश झाला होता. यात हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राज चेट्टी, मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक आणि सीईओ राहुल शर्मा, स्नॅपडीलचे सहसंस्थापक आणि सीईओ कुणाल बहल, ट्विटरच्या कार्यकरी चमूतील एकमेव महिला विजया गाड्डे यांचा समावेश होता.