शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 13:47 IST

असे म्हटले जाते की, १६ व्या शतकात ‘पिता’ शब्द अस्तित्वात आला होता. वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस प्रत्येकासाठी एक विशेष दिवस असतो.

-Ravindra More फादर्स डे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही जर घरात तर काही चित्रपट किंवा डिनरचे आयेजन करुन बाहेर साजरा करतात. असे म्हटले जाते की, १६ व्या शतकात ‘पिता’ शब्द अस्तित्वात आला होता. वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस प्रत्येकासाठी एक विशेष दिवस असतो. खरं पाहिले तर आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान आगळेवेगळेच असते. त्यांच्या छत्रछायेत आपण लहानाचे मोठे होतो. या जगात वावरण्या इतकं बळ मिळतं ते वडिलांनी दिलेले प्रेम, शिकवण, संस्कारामुळेच. एखाद्या वेळी वेळात वेळ काढून वडिलांसोबत बसा आणि त्यांच्या गोष्टी, त्यांचे विचार, अनुभव, व्यतित केलेले आयुष्य, त्यासंबंधी जुडलेल्या घटना हे सर्व ऐका. यावरुन समजेल की, वडिलांची भूमिका किती कठीण असते. त्यांच्या या अनुभवातून आपणासही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. फादर्स डे वडिलांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात साजरा केला जातो. काही देशांमध्ये हा दिवस जूनच्या तिसऱ्या रविवारी, तर काही देशांमध्ये इतर दिवशी साजरा केला जातो. फादर्स डेची सुरुवात विसाव्या शतकात झाली. या दिवसाची सुरुवात करण्याचा उद्देश म्हणजे वडिलांनी आपले जे पालनपोषण केले त्याप्रति आदर-सन्मान करणे होय. यादिवशी मुले वडिलांना गिफ्ट देतात, वडिलांसाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करतात शिवाय काही कौटुंबिक कार्यक्रमाचेही आयोजन करतात. जगात सर्वप्रथम फादर्स डे पश्चिम वर्जिनियाच्या फेयरमोंटमध्ये ५ जुलै १९०८ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिली फादर्स चर्च आजदेखील सेन्ट्रल यूनाइटेड मेथोडिस्ट चर्चच्या नावाने फेयरमोंट मध्ये स्थित आहे. ६ डिसेंबर १९०७ मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका अपघातात सुमारे २१० वडील मृत्यू झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ फादर्स डेचे आयोजन ग्रेस गोल्डन क्लेटन नावाच्या महिलेने केले होते.  आजच्या फादर्स डे निमित्त आपण वडिलांसाठी काहीतरी नवीन बनविण्याचे आयोजन करु शकता. त्यात आपण त्यांना न कळत त्यांच्या सर्व मित्रांना लंच किंवा डिनरसाठी घरी बोलवू सरप्राईज देऊ शकता. तुमचे वडिल आॅफिसमधून घरी आल्यानंतर त्यांना फादर्स डे विश करुन चकित करु शकता. एक वडील आणि मुलांचे नाते खरच वेगळे असते.वडिलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात वृद्ध वडील म्हणून एका शेतकऱ्याला गौरविण्यात आले आहे, ज्यांचे नाव नानू राम जोगी आहे. ९० वर्षीय जोगी २००७ मध्ये आपल्या २१ व्या मुलांचे वडील बनले होते. Also Read : ​Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !