शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : ​सध्या ‘या’ प्रकारच्या ब्लाऊजची आहे क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 17:16 IST

साडीचे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही परिधान केलेले ब्लाऊज महत्त्वाची भूमिका बजावते.

बहुतांश महिला लग्नसोहळा किंवा विविध कार्यक्रमात जर साडी परिधान करीत असेल तर साडीसोबत लेहंगा, घागरा चोळी किंवा शरारा परिधान करण्यास अधिक प्राधान्य देते. विशेष म्हणजे साडीचे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही परिधान केलेले ब्लाऊज महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या डीप नेक, हेवी वर्क आणि बॅकलेस असे प्रकारचे ब्लाऊज लोकप्रिय झाले आहेत. यासाठी फ्रंट नॉट, हॉस्टर बॅक ओपन, चोळी, स्लिव्हलेस असे विविध प्रकाराचे ब्लाऊज तुम्ही वापरू शकता. ब्लाऊजचा गळा जसे त्याचे सौंदर्य खुलवतो तसेच ब्लाऊजचे हातसुद्धा आकर्षक असण्याकडे स्त्रियांचा आग्रह असतो. पूर्ण हाताचे, थ्री फोर्थ, स्लिवलेस किंवा फुग्याच्या हाताचे ब्लाऊज बाजारात पहायला मिळतात. पूर्ण हाताचे नेटचे ब्लाऊज, बंद नेटचा गळा याला जास्त पसंती आहे.जाळीवर विणकाम केलेल्या ब्लाऊजचीही सध्या फॅशन आहे. शरारा, लेहंगा यावर हे ब्लाऊज परिधान करून राजस्थानी वेशभूषा करता येईल. साऊथ इंडियन मोठ्या काठपदराची साडी लोकप्रिय आहे. या साडीवर मोठ्या काठाचे कोपऱ्यापर्यंतचे हात शिवण्याची फॅशन पुन्हा आली आहे. यामुळे तुम्ही हा हटके लुक करू शकता.आजकाल मिसमॅच पद्धतीचे कपडे परिधान केले जातात. साडीच्या रंगाच्या विरुद्ध रंगाचा ब्लाऊज शिवून अगदी साध्या साडीला उठावदार बनवता येते. छापील नक्षीचे भागलपुरी सिल्क ब्लाऊज बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. एकाच रंगाच्या साडीवर हे ब्लाऊज छान उठून दिसतात. चंदेरी किंवा सोनेरी रंगाचे ब्लाऊज कुठल्याही साडीवर शोभून दिसतात. स्लिवलेस, मेगा स्लीव्हज, नॉट्स, स्पगेटी, हॉल्टर नेक, प्रिन्सेस लाईन ब्लाऊज अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे ब्लाऊज शिवून घेता येतात.