'ऑस्करवरून उलटसुलट चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:41 IST
ऑस्करच्या नॉमिनीमध्ये वैविध्यतेच्या अभावाबाबत टीका...
'ऑस्करवरून उलटसुलट चर्चा
आॅस्करच्या नॉमिनीमध्ये वैविध्यतेच्या अभावाबाबत टीका होत असून, ती होणेही गरजेची आहे. या वाद-विवाद आणि चर्चेमुळे मनोरंजनविश्वाची व्याप्ती वाढेल, असे मत हॉलिवूड मुव्ही अकॅडमीच्या अध्यक्षा चेरील बोन आसासीस यांनी व्यक्त केले आहे. अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँन्ड सायन्स या संस्थेच्या युरोपमधील नवीन सदस्य निवडीप्रसंगी लंडनमधील अमेरिकन दुतावासात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, की वैविध्यपूर्णतेबाबत झालेली चर्चा ही खूपच रंजक होती आणि ती गरजेचीही आहे.