फेसबुकचा नवीन टीव्ही 'चेक इन' फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:12 IST
सोशल मीडिया आता केवळ चॅटिंग, फोटो शेअरिंग किंवा स्टेटस् अपडेट...
फेसबुकचा नवीन टीव्ही 'चेक इन' फंडा
सोशल मीडिया आता केवळ चॅटिंग, फोटो शेअरिंग किंवा स्टेटस् अपडेटसाठीच राहिला नसून तो आता अधिक प्रगल्भ झाला आहे. हॉटेल, मॉल, फिल्म थिएटर आणि शहरामध्ये आतापर्यंत तुम्ही फेसबुकवर चेक-इन करत होता मात्र येथून पुढे तुमच्या आवडत्या टीव्ही शो पाहतानासुद्धा तुम्ही चेक-इन करू शकणार आहात. या नवीन ऑप्शनसाठी फेसबुक नवीन आयकॉन्ससुद्धा आणणार आहे. तुम्ही पाहत असलेले टीव्ही शो मित्रांसोबत शेअर क रण्याचा यामुळे पर्याय उपलब्ध होणार आहे. आपण नाही का आपल्याला आवडलेल्या मालिकेबद्दल मित्रांना सांगतो, एखादे चांगले गाणे असेल तर लगेच मित्रांना ते ऐकायला लावतो, चित्रपट असेल तर त्यांना पाहायला लावतो. टीव्ही शो 'चेक-इन' अगदी तसाच प्रकार आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाचा एक स्पेशल आयकॉन फेसबुक देणार आहे. याचा उपयोग असा, की समजा एमी अँवार्डस् बघत असताना तुम्ही फेसबुकवर ते चेक-इन केले तर तुमच्या प्रोफोईलवर एमी स्टॅच्यू आणि गेम ऑफ थ्रोन्स पाहताना 'थ्रोन' दिसेल. शिवाय आवडत्या शोच्या कलाकारांशी थेट जुळण्याची देखील संधी मिळणार आहे. त्यांना व्हिडियोद्वारे प्रश्न विचारता येणार आहे तसेच ऑडिशनसुद्धा देता येणार आहे.