आता फेसबुकवर येणार ‘फोटो फ्रेम्स’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 15:42 IST
काही देशातील यूजर्ससाठी फेसबुकने ‘फोटो फ्रेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले असून, लवकरच भारतातही सुरू होणार आहे.
आता फेसबुकवर येणार ‘फोटो फ्रेम्स’!
काही देशातील यूजर्ससाठी फेसबुकने ‘फोटो फ्रेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले असून, लवकरच भारतातही सुरू होणार आहे. स्नॅपचॅट या लोकप्रिय अॅप्लिकेशन्सचे अनेक फिचर फेसबुक कॉपी करत असून, आता ‘फोटो फ्रेम्स’चीही त्यात भर पडणार आहे. हे फिचर स्नॅपचॅटच्या ‘जिओ-फिल्टर्स’ची नक्कल असून, हे एक लोकेशनवर आधारित टुल आहे. यात कुणीही आपल्याला हव्या त्या सॉफ्टवेअरमध्ये (उदा. फोटोशॉप, कोरल आदी) डिझाईन तयार करून ते पारदर्शक पार्श्वभाग असणाऱ्या पीएनजी या फॉर्मेटमध्ये फेसबुकवर अपलोड करावे लागेल. यानंतर फेसबुककडून संबंधित फ्रेमला मान्यता मिळाल्यानंतर यात लोकेशनसह अन्य माहिती भरावी लागते. यानंतर संबंधित यूजरसह त्याचे जवळच्या परिसरात असणारे मित्र या फ्रेममध्ये आपले छायाचित्र अपलोड करून ते फेसबुकवर शेअर करू शकतात. यासाठी फेसबुकने एक आॅनलाईन टुलदेखील सादर केले आहे. यावर फ्रेम अपलोड करण्यात येते. सध्या मेक्सिको, ब्रिटन, कोलिंबिया, तैवान आणि आयर्लंड या देशांमधील यूजर्सला हे फिचर देण्यात आले असून आगामी काळात भारतातही हे लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.