मानवी प्रजोत्पदानाचे नवे तंत्रज्ञान विकसित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 10:54 IST
कृत्रिमरीत्या मानवनिर्मिती करण्यासाठी मानवाची धडपड कित्येक शतकांपासून चालू आहे. त्याला आता यश मिळू ...
मानवी प्रजोत्पदानाचे नवे तंत्रज्ञान विकसित
कृत्रिमरीत्या मानवनिर्मिती करण्यासाठी मानवाची धडपड कित्येक शतकांपासून चालू आहे. त्याला आता यश मिळू शकते, अशी आशा निर्माण झाली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला विट्रो गॅमिटोजेनेसिस (आयव्हीजी) असे नाव देण्यात आले आहे.आव्हीजी तंत्रज्ञानाद्वारे प्लुरिपोटेन्ट स्टेम सेलमधून जनजपेशी वेगळया केल्या जातात ज्यापासून नवीन जीवाची निर्मिती केली जाऊ शकते. अद्याप केवळ उंदरावरच याचा प्रयोग करण्यात आला असून मानवाच्या बाबतीत याचा नैतिकपणे आणि कायद्याला धरून कसा वापर करण्यात येईल याची चाचपणी केली जात आहे. आगामी काळात आव्हीजी टेक्निक ही मानवी प्रजोत्पदानाची क्रांतिकारी मेथड ठरणार यात संशोधकांना तरी काही शंका नाही. याबाबत प्राध्यापक सोनिया सुटर यांनी सांगितले की, 'आयव्हीजीमुळे जन्मापूर्वीच निरोगी आणि शक्तिमान गर्भ निवडून स्वस्थ बाळांना जन्म देणे शक्य होणार आहे.' ज्यांना मुलंबाळ होत नाही अशा जोडप्यांना आयव्हीजीमुळे मोठा फायदा होणार आहे.